आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 राज्यांमध्ये पूर: लेहमध्ये गाव तर प. बंगालमध्ये बस गेली वाहून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले तर लोकांनी नावांमधून प्रवास सुरु केला आहे. - Divya Marathi
पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले तर लोकांनी नावांमधून प्रवास सुरु केला आहे.
नवी दिल्ली/कोलकाता/श्रीनगर - जोरदार पर्जन्यवृष्टी आणि पुरामुळे जम्मू-काश्मीरच्या लेहमधील साबू गाव वाहून गेले आहे. लेहमध्ये दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रविवारी रात्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. गावात पाणी शिरल्याने मातीची अनेक घरे वाहून गेली. गावात जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले. अजूनही अनेक लोक अडकलेले असण्याची शक्यता आहे. त्यात काही विदेशी पर्यटक असण्याचीही शक्यता आहे. गाव वाहून जाण्याला ढगफुटी हे कारण असल्याचेही मानले जात आहे. मदत कार्यासाठी सरकारी यंत्रणेसोबतच लष्कराचे जवानही दाखल झाले आहेत. साबू गाव हे लेह विमानतळापासून सात किलोमीटर अंतरावर तर मनाली-लेह हायवेवर आहे. दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर सुरु आहे. सोमवारी सकाळी पश्चिम बंगालमधील बीरभूम येथे एक बस वाहून गेली. मात्र त्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. पाऊस आणि पुरामुळे मृतांची संख्या शंभरावर गेली आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पश्चिम बंगाल आणि मणिपूरमधील पावसाचा कहर
बातम्या आणखी आहेत...