आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MP: 7 जिल्‍ह्यात हायअलर्ट: आंध्रप्रदेशात गोदावरीला पूर, 28 गावांचा संपर्क तुटला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/भोपाळ- मध्यप्रदेशातील काही जिल्‍ह्यांमध्‍ये पाऊस थांबाचये नाव घेत नसल्‍याने जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. काही जिल्‍ह्यांमध्‍ये मंगळवारी रात्रीपासून दोरदार पावसाला सुरुवात झाली. भोपाळमध्‍ये झालेल्‍या पावसामुळे बडा तलाव पूर्ण भरला आहे; भदभदा डॅमचे गेट उघडण्‍यात आले आहेत. एक जूनपासून आतापर्यंत देशात साधारणपणे 4 टक्‍के पाऊस झाला आहे. मध्‍यप्रदेशासह आंध्र प्रदेश, गुजरात आणि आसामच्‍या काही भागांमध्‍ये पूराची परिस्‍थिती पाहायला मिळत आहे. गोदावरीला पूर आल्‍यामुळे परिसरातील 28 गावांचा संपर्क तुटला आहे. 6 अपडेट्समध्‍ये वाचा देशात कशी आहे पावसाची स्थिती..
- विदिशा जिल्‍ह्याच्‍या कुरवाई ब्लॉकमध्‍ये दुचाकीस्‍वार भुजबळ नाल्‍यात वाहून गेला आहे. त्‍याच्‍या मागे बसलेल्‍या महिलेल्‍या वाचवण्‍यात यश आले आहे.
- सीहोरच्‍या इछावरमध्‍ये 3 तासात 8 इंच आणि आष्टामध्‍ये 5 तासात 3 इंच पाऊस झाला आहे.
- रायसेन जिल्‍ह्यातील बारना डॅमचे 8 दरवाजे उघडण्‍यात आले आहेत.
- जयपूर-जबलपूर राष्‍ट्रीय महामार्ग सोमवार-मंगळवारच्‍या रात्रीपासून बंद आहे.
- पावसामुळे भोपाळ, होशंगाबाद व इटारसीच्‍या शाळांना सुटी जाहीर करण्‍यात आली आहे.
#1. आंध्रप्रदेश : गोदावरीला पूर..
- गोदावरीला पूर आल्‍यामुळे 28 गावांचा संपर्क तुटला आहे.
- महाराष्‍ट्राच्‍या पाणलोट क्षेत्रात झालेल्‍या पावसामुळे हा पूर आला आहे;
- भाद्रांचलममध्‍ये सोमवारी गोदावरीला 49.5 फुट पाणी होते, मंगळवारी पाणी 53 फुटापर्यंत पोहोचले.

#2. बिहारमध्‍ये जेथे पुराची शक्‍यता होती तेथे पाऊस नाही..
- बिहारच्‍या 26 जिल्‍ह्यांमध्‍ये आतापर्यंत कमी पाऊस झाल्‍याने दुष्‍काळाची परिस्थीती आहे.
- काही भागात जोरदार पावसाची शक्‍यता होती. मात्र पाऊस आला नाही.
- शिवहर आणि सीतामढी जिल्‍ह्यात पूराची शक्‍यता हवामान विभागाने सांगितली होती.
#3. महाराष्ट्र : वैनगंगा नदीमध्‍ये नाव बुडून, दोन जण बेपत्‍ता आहेत..
- चंद्रपूर जिल्‍ह्यातील 12 जण वैनगंगा नदी पार करत होते. दरम्‍यान हा अपघात झाला.
- यापैकी 10 लोकांना वाचवण्‍यात यश आले आहे.
- गेल्‍या तीन वर्षांपासून दुष्‍काळाचा सामना करणा-या महाराष्‍ट्रात सध्‍या समाधानकारक पाऊस आहे. दुष्‍काळग्रस्‍त मराठवाड्यातही जोरदार पाऊस झाला;
- या महिन्‍यात राज्‍यात 243 मिलीमीटर पावसाचा विक्रम झाला आहे.
- महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्‍ये सर्वाधिक 172 मिमी पाऊस झाला आहे.
#4. राजस्थान: 12 दिवसात वाहते झाले 15 धरणे..
- राजस्थानमध्‍ये मागील 12 दिवसांपासून पावसाला सुरूवात झाली.
- 30 जूनपर्यंत 822 धरणांपैकी एकही धरण पूर्ण भरलेले नव्‍हते.
#5. हरियाणा : काही भागात जोरदार पाऊस..
- हरियाणामध्‍ये काही भागात जोरदार पाऊस झाला. रस्‍त्यांवर अर्धा फुट पाणी थांबले.
- पानीपत, जींद, गुडगाव आणि सोनीपत जिल्‍ह्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला.
- पानीपतच्‍या रस्‍त्यांवर अर्धा फुट पाणी साचले होते.
#6. दिल्लीमध्‍ये बुधवारी पावसाचा अंदाज..
-दिल्लीमध्‍ये अजूनपर्यंत पावसाने जोर धरला नाही.
- मंगळवारी रिमझीम पाऊस आला होता.
- हवामान विभागाच्‍या अंदाजानुसार बुधवारी दिल्‍लीत पावसाची शक्‍यता आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, देशातील विविध राज्‍यातील पुर परिस्‍थितीचे चित्र..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...