फोटो - श्रीनगरच्या अनंतनाग जिल्ह्यात बुधवारी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील 30 गावे बुडाली आहेत.
अमृतसर - जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सलग पडणा-या पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. सुमारे 30 गावांवर पुराचा परिणाम जाणवत आहे. राज्यात आतापर्यंत चार मुलांसह नऊ जण मृत्युमुखी पडले आहेत. तर भूस्खलनामुळे दोनवेळा महामार्गावरील वाहतूक थांबवावी लागली.
लष्कराच्या जवानांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले आहे. बुधवारी जोजिला परिसरात भूस्खलन झाल्याने श्रीनगर-लेह हायवे बंद करावा लागला होता. रियासीमध्ये झाड कोसळून तीन कुटुंबांमधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात चार लहान मुलांचा समावेश आहे. तसेच पुंछ जिल्ह्यात दोन ठिकाणी दोन जण ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. याच जिल्ह्यातील बीएसएफचे बंकरही वाहून गेले आहे. त्यात इन्सपेक्टर मोहम्मद रशीद जखमी झाला. येथे काही शस्त्रे वाहून गेल्याचेही वृत्त आहे.
35 कुटुंबांना वाचवले
पोलिस आणि लष्कराने मदत कार्य करत 35 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. काश्मीरमध्ये झेलमच्या किना-यावर राहणा-या नागरिकांना घरे रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येथे पावसाच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कुलगाम, बडगाम, गांदरबल, अनंतनागसह अनेक परिसरांमध्ये पुरात फसलेल्या नागरिकांना मोहीम राबवून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पूर आणि मदत कार्याचे फोटो...