आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेलगाम विमान प्रवाश्यांना 15 लाखांचा दंड लावणार, वाढत्या वादांमुळे एयर इंडियाचा विचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
नवी दिल्ली - विमान प्रवासासाठी वेळेवर न पोहचणाऱ्या किंवा कर्मचाऱ्यांशी वाद घालणाऱ्या प्रवाश्यांना लवकरच 5 लाख रुपये ते 15 लाख रुपयांपर्यंतचा दंड लावला जाणार आहे. एयर इंडियाने जाहीर केलेल्या माहितीप्रमाणे, फ्लाईट अर्धा तास उशीर करणाऱ्या प्रवाश्यांना 5 लाख रुपये, एक तास पर्यंत उशीर करणाऱ्यांना 10 लाख रुपये आणि 2 तासांपर्यंत उशीर करण्यास भाग पाडणाऱ्या प्रवाश्यांना 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाईल. एयर इंडिया यावर सध्या विचार करत असून लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
 
विमान प्रवाश्यांकडून एयरलाईन्स कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना होणारा त्रास, मारहाणीचे प्रकार आणि इतर वाद टाळण्यासाठी एयर इंडियाने हा निर्णय घेतला. एयर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, प्रत्येक हॉटेलांना सुद्धा कुणाला प्रवेश द्यावा आणि कुणाला नाही याचे अधिकार आहेत. मग, एयरलाईन्स कंपन्यांना का नाही.
 
खासदार गायकवाड, वायएसआर काँग्रेस पुढाऱ्यांमुळे निर्णय?
यापूर्वी घडलेल्या 3 घटनांचा दाखला देऊन एयर इंडियाने हा निर्णय घेतला. त्यामध्ये नुकतेच घडलेला शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड आणि एयरलाईन्स ज्येष्ठ अधिकाऱ्याचा वाद, तिरुपती येथे वायएसआर काँग्रेस खासदार आणि एयर इंडिया अधिकाऱ्यांतील वाद आणि तृणमूल खासदारांमुळे घडलेल्या वादांचा समावेश आहे. 
बातम्या आणखी आहेत...