आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेटलींनी मांडला वर्षभराच्या लेखाजोखा म्हणाले, जगात दिसतोय भारताचा प्रभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी केंद्र सरकारच्या एका वर्षाच्या कार्याचा आढावा सादर केला. मोदी सरकारने या एका वर्षात भ्रष्टाचारमुक्त सरकार चालवल्याचे जेटली यावेळी म्हणाले. लोकांच्या खिशात जास्तीत जास्त पैसा राहावा हाच आमचा प्रयत्न असल्याचे जेटली म्हणाले. त्यासाठीच आम्ही दोन वेळा इन्कमटॅक्समध्ये सूट दिली असेही ते म्हणाले.
संपूर्ण जगभरात भारत आणि पंतप्रधानांचा प्रभाव दिसला आहे. इराक, मालदीव, यमन, नेपाळमध्ये जेव्हा संकट आले तेव्हा कूटनितीद्वारे भारताने छाप सोडली. दिल्लीतील वादाबाबत बोलताना जेटली म्हणाले की, केंद्राकडे काही अधिकार आहेत आणि संविधानात त्याचा स्पष्ट उल्लेखही आहे.

निर्णयप्रक्रिया वेगात
अर्थमंत्री जेटली म्हणाले की, गेल्या एका वर्षात निर्णय घेण्याचा वेग वाढला आहे. जेटली म्हणाले की, आमचे प्राधान्य जीएसटी आणि भू संपादन ही विधेयके संसदेत मंजूर करून घ्यायला आहे. काळ्या पैशासंबंधीच्या विधेयकाबाबत ते म्हणाले की, याबाबत लवकरच अधिसूचना जारी केली जाणार आहे. जेटली म्हणाले, तपास संस्थांचा गैरवापर ही आता जुनी बाब झाली आहे. त्यात प्रामाणिक लोकांनी व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्नही झाला आहे. ते म्हणाले की, या सरकारच्या करप्रणालीबाबतही काही वाद झाले नाही. काही जुने वाद आहेत, तेही लवकरच मिटवू असे ते म्हणाले.

आठवडाभर चालतील कार्यक्रम
मोदी सरकारचे एक वर्ष पूर्ण झाल्याचा जल्लोष एक आठवडाभर चालणार आहे. सरकार पत्रकार परिषदा, सभा आणि माध्यमांद्वारे नागरिकांमध्ये केलेल्या कामाबाबतची माहिती पोहोचवणार आहे. सरकारचे वरिष्ठ मंत्री रोज पत्रकार परिषदेत संबोधित करणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 मे रोजी मथुरा येथे सभा घेणार आहेत. मोदींनी बुधवारी वरिष्ठ मंत्र्यांबरोबर चर्चाही केली होती.

अर्थमंत्री अरुण जेटलींनंतर आता शनिवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर निर्मला सीतारमण आणि स्मृती इराणी, पीयूष गोयल, सुषमा स्वराज, राधामोहन सिंह आणि नितिन गडकरी यांच्या पत्रकार परिषदा होतील. 26 तारखेला सरकारला एक वर्ष पूर्ण होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...