आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अाणखी मदतीचा विचार - अर्थमंत्री अरुण जेटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे झालेले नुकसान पाहता सरकार शेतकऱ्यांना आणखी मदत देण्याबाबत विचार करत आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी ही माहिती दिली.
जेटली म्हणाले,‘सध्या मदत देण्याबाबत उदार धोरण अवलंबणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने मदतीची रक्कम ५० टक्क्यांनी वाढवली आहे. पण ती पुरेशी आहे, असे मला वाटत नाही. ती वाढवावी, असे मला वाटते. मदत ५० टक्क्यांनी वाढवणे हे पहिले पाऊल आहे. भविष्यात सरकार त्या दिशेने आणखी पावले उचलेल.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना जास्त भरपाई देण्याची घोषणा केली होती. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या नियमांत महत्त्वाच्या बदलांची घोषणा त्यांनी केली होती. आता ज्यांच्या पिकांचे ३३ टक्के नुकसान झाले आहे असे शेतकरीही मदतीसाठी पात्र असतील. पूर्वीच्या नियमांनुसार किमान ५० टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच भरपाई मिळत होती.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सध्याच्या मदतीच्या रकमेत ५० टक्के वाढ केली जाईल, अशी घोषणाही मोदींनी त्या वेळी केली होती. शेतकऱ्याला आधी एक लाख रुपये भरपाई मिळत असेल तर आता दीड लाख रुपये मिळतील, असे माेदींनी सांगितले होते.