आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात 12 ठिकाणी नवीन एफएम ट्रान्समीटर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महाराष्ट्रातील बार्शी, हिंगोली, महाड, नंदुरबार, पंढरपूर, राजापूर, संगमनेर, सटाणा, शिर्डी, सिरोंच, उमरखेड, वाशीम या 12 ठिकाणी आकाशवाणी 100 वॅट क्षमतेचे नवीन सहक्षेपण एफएम ट्रान्समीटर स्थापन करणार असून त्यासाठी नेटवर्क क्षमता वाढवण्यात येत आहे.
देशभरात आकाशवाणी 184 नवीन सहक्षेपण ट्रान्समीटर स्थापन करणार असल्याची माहिती व नभोवाणी राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. 12 व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत देशभरातील 9 ठिकाणी आणि 11 व्या योजनेअंतर्गत 7 ठिकाणी नवीन आकाशवाणी केंदे्र स्थापन करण्यात येणार आहे