आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Focus On Tourist Security Union Tourism Minister Chiranjivi

‘परदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना’ - केंद्रीय पर्यटनमंत्री चिरंजीवी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशात विदेशी पर्यटकासंदर्भात गुन्ह्यांचे प्रमाण पाहता, विदेशी पर्यटकांना पुरेशी सुरक्षा पुरवण्याचा पर्यटन मंत्रालयाचा विचार आहे. यासंदर्भात मंत्रालय राज्य सरकारांशी चर्चा करणार असून केंद्रीय पर्यटनमंत्री चिरंजीवी जुलै महिन्याच्या प्रारंभी राज्यांच्या पर्यटनमंत्र्यांची एक बैठक बोलावणार आहेत. अशा घटनांमुळे परदेशी पर्यटकांचे प्रमाण कमी होऊ शकते, असे चिरंजीवी म्हणाले.

पर्यटन हे रोजगाराच्या संधी निर्माण करणारे क्षेत्र असून दारिद्र्य निर्मूलन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे चिरंजीवी म्हणाले. देशात येणारे प्रत्येक 30 परदेशी प्रवासी रोजगाराची एक संधी निर्माण करतात. गेल्या वर्षी सकल राष्‍ट्रीय उत्पन्नात पर्यटन क्षेत्राने 6.8 टक्के योगदान दिल्याचे चिरंजीवी यांनी सांगितले. याशिवाय परदेशी चलनाच्या रूपात 94,487 कोटी रुपये महसूल मिळाल्याची माहिती चिरंजीवी यांनी दिली.