आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fodder Scam Case: SC Accepted The CBI Plea, Lalu Prasad Yadav To Face Fresh Trial

लालूंवर चालणार गुन्‍हेगारी कट रचल्याचा खटला; चारा घोटाळा प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ९५० कोटी रुपयांच्या चारा घाेटाळ्यात अडकलेल्या लालूप्रसाद यादव यांना सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला. झारखंड हायकोर्टाचा निर्णय फिरवत चारा घोटाळ्यातील उर्वरित ५ प्रकरणांत लालूंविरुद्ध खटला चालवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. कनिष्ठ न्यायालयांना पाचही प्रकरणांत खटले चालवून नऊ महिन्यांत सुनावणी पूर्ण करावी लागेल. यादरम्यान कटाच्या अारोपांवरही सुनावणी होईल. 
 
 
यापूर्वी झारखंड हायकोर्टाने लालूप्रसाद यादव व चारा घोटाळ्यातील इतर आरोपींवरील गुन्‍हेगारी कटाचा व इतर गुन्‍हेगारी स्‍वरुपाची कलमं हटवली होती. त्‍याविरोधात सीबीआयने सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. 
 
सुप्रीम कोर्टाने सीबीआयला फटकारले 
- झारखंड हायकोर्टाने 2014 मध्‍ये या प्रकरणाची सुनावणी करताना लालूंविरोधातील गुन्‍हेगारी स्‍वरुपाची कलमं हटविली होती. 
- सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्‍यान लालू यांचे वकिल राम जेठमलानी यांनी सांगितले की, 'लालूंवरील सर्व आरोप एकसारखेच आहेत. त्‍यामुळे त्‍यांची एकत्रच सुनावणी करण्‍यात यावी.' 20 एप्रिलला या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. 
- चारा घोटाळा प्रकरणी लालूप्रसाद यादव यांच्‍याविरोधात 6 खटले दाखल झाले आहेत. त्‍यातील एका खटल्‍यात त्‍यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्‍यात आली आहे. या शिक्षेविरोधात लालू यांनी कोर्टात आव्‍हान दिले आहे.  
- सुप्रीम कोर्टात उशिरा याचिका दाखल केली म्‍हणून सीबीआयला सुप्रीम कोर्टाने चांगलेच फटकारले होते.    
 
काय आहे चारा घोटाळा? 
- चारा घोटाळा हा बिहारच्‍या पशुपालल विभागाशी संबधित आहे. यावेळी लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्‍यमंत्री होते. 
- हा घोटाळा 1996 मध्‍ये उघडकीस आला होता.  
- पशुपालन विभागाकडून चारा खरेदीमध्‍ये तब्‍ब्‍ल 950 कोटी रुपयांचा भ्रष्‍टाचार झाल्‍याचे नंतर उघडकीस आले होते.
- याप्रकरणात एकूण 56 आरोपींवर खटले दाखल करण्‍यात आले आहेत. यामध्‍ये राजकारणी, अधिकारी आणि चारा पुरवठादार यांचा समावेश आहे. 
- या घोटाळ्याशी संबधित 7 आरोपींचा मृत्‍यू झाला आहे. दोन जण सरकारी साक्षीदार बनले आहेत. एकाजणाने आपला गुन्‍हा मान्‍य केला आहे व एका आरोपीला कोर्टाने निर्दोष म्‍हणून सोडून दिले आहे.  
बातम्या आणखी आहेत...