आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fog Cripples Train, Flight Services In Uttar Pradesh

उत्तर प्रदेशात दाट धुक्याचा ‘रेल रोको’, 53 गाड्या रद्द; काश्मिरात हिमस्खलनाचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उत्तर भारतात दाट धुक्यामुळे सोमवारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली. साधारण 65 रेल्वेगाड्या अनेक तास उशिराने धावल्या. यामध्ये राजधानी, शताब्दी, अन्य मेल व एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. ‘रेल रोको’मुळे हजारो प्रवाशांची मात्र तारांबळ उडाली.
महानंदा एक्स्प्रेस 17 तास, तर ब्रrापुत्र मेल 15 तास उशिराने धावत होती. तुफान एक्स्प्रेस आणि विक्रमशीला एक्स्प्रेस 13.5 तास उशिराने धावत होती. भुवनेश्वर, पाटणा, हावडा, सियालदहकडे जाणार्‍या राजधानी आणि लखनऊकडे जाणारी शताब्दी एक्स्प्रेस उशिराने धावली. उत्तर भारतात दाट धुके पडल्यामुळे रविवारपासून 53 रेल्वे गाड्या दहा दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्लीत दोन दिवस थंड वारे वाहिल्यानंतर सोमवारी सूर्यदर्शन झाले. येथे रविवारच्या तुलनेत किमान तापमान 12 वरून 12.5 आणि कमाल तापमान 17.4 वरून 18.4 अंश सेल्सियस राहिले.
प्रसिद्ध स्की रिसोर्ट गुलर्मगमध्ये साधारण 1.25 सें.मी. बर्फवृष्टी झाली. येथील किमान तापमान आणखी 3 अंशांनी घसरून 9.6 अंश सेल्सियसवर आले. पहलगाममध्ये 20 सें.मी. बर्फवृष्टी झाली आहे. रविवारी रात्री किमान तापमान उणे 4 अंश सेल्सियस होते. राज्यात सर्वात कमी तापमान लडाखच्या लेह क्षेत्रात उणे 9 अंश सेल्सियस होते. हिमाचल प्रदेश गारठले आहे. जास्त उंचावरील क्षेत्रात तुरळक पाऊस झाला.
काश्मिरात हिमस्खलनाचा इशारा
जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरूच असल्यामुळे किमान तापमान गोठण बिंदूच्या खाली घसरले आहे. र्शीनगरमध्ये रात्री 0.5 मि.मी. पाऊस झाला. यानंतर येथे किमान तापमान उणे 0.4 अंश सेल्सियसपर्यंत खाली आले. काश्मीर खोर्‍यातील बर्फवृष्टीमुळे प्रशासनाने हिमकडा कोसळण्याचा इशारा दिला आहे. ज्या भागात हिमस्खलन होण्याची शक्यता आहे, तिथे न जाण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. बर्फवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दुसर्‍या दिवशीही बंद ठेवण्यात आली.