आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Follow Laws For Gazatted Officers Suspension,Centre Order To States

सनदी अधिका-यांच्या निलंबनाचे नियम पाळा,केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोकरशहांच्या मनमानी पद्धतीने केल्या जाणा-या निलंबनास आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना निलंबनासाठीचे नियम पाळण्याचे निर्देश दिले आहेत. अधिका-यांचे निलंबन काळजीपूर्वक पद्धतीने केले जावे, अशी सूचना राज्यांच्या सचिवांना 21 जानेवारी रोजी लिहिलेल्या पत्रात करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तिवेतन विभागाचे राज्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली.
राज्य सरकारांकडून निलंबनाची कारवाई अन्यायकारक पद्धतीने होत असल्याची तक्रार आयएएस, आयपीएस आणि आयएफओएस अधिका-यांच्या संघटनांनी केंद्र सरकारकडे केली होती. उत्तर प्रदेशातील आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांच्या निलंबन प्रकरणावरून सनदी अधिका-यांच्या संघटनेने त्याविरोधात आवाज उठवला होता. एका मशिदीची बेकायदेशीर संरक्षक भिंत पाडण्याचे आदेश त्यांनी दिले होते. यानंतर नागपाल यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली. नागपाल यांनी वाळूमाफियाविरुद्ध कडक भूमिका घेतल्यामुळेच त्यांना निलंबित केल्याचे सांगण्यात येते.