आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Food Security Bill May Increase Financial Deficit

‘अन्नसुरक्षे’मुळे वित्तीय तूट वाढण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अन्नसुरक्षा विधेयकाचा परिणाम सार्वजनिक क्षेत्रासाठी दिल्या जाणार्‍या निधीवर होणार असून वित्तीय तूट वाढून ती सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी)पाच टक्क्यापर्यंत पोहोचणार असल्याचे फिक्कीने नमूद केले आहे. फिक्कीने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, ‘या विधेयकामुळे सरकारी खजिन्यावर अतिरिक्त भार पडणार आहे. ही तूट कमी करणे कठीण जाणार असून ती वाढून 5 टक्क्यांवर पोहोचेल. अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत (4.8) ही तूट काहीशी जास्त आहे.’

सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे अन्नधान्य पुरवठ्यात अनेक अडचणी : या सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे अन्न-धान्य पुरवठा करण्यामध्ये अनेक अडचणी आहेत. त्यामुळे पुरवठा करताना काळजी घेणे गरजेचे ठरेल. 3 जुलै रोजी सरकारने देशाच्या दोन तृतीयांश जनतेला एक ते तीन रुपये किलो दराने धान्य उपलब्ध करून देण्याची अधिसूचना काढण्याचा निर्णय घेतला आहे. अंमलबजावणीनंतर अशा प्रकारची ही देशातील पहिलीच योजना असेल. यामध्ये देशातील 67 टक्के लोकसंख्येला 6 कोटी 20 लाख टन तांदूळ, गहू आणि इतर धान्य पुरवण्यासाठी सरकारला दरवर्षी सव्वालाख कोटी रुपये खर्च करावे लागतील.

यासंदर्भात लवकर पावले उचलली गेली नाहीत तर, औद्योगिक उत्पादनात घट आणि वाढत्या तोट्यामुळे रुपयाची किंमत घटल्याने देशाच्या विकासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणात सहभागी अर्थतज्ज्ञांनी चालू वर्षात देशाचा आर्थिक विकास दर 6 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.


रुपया घसरल्याचा फटका
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या बहुतांश अर्थतज्ज्ञांनी या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत रेपो दर 0.5 ते 0.75 टक्क्यांनी घटणार असल्याची आशा व्यक्त केली आहे, तर चालू खात्यामध्ये झालेला तोटा रुपयाची किंमत घटल्यामुळे वाढणार असल्याचेही म्हटले आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात हा तोटा 5 टक्के राहील असा अंदाज आहे.