आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अन्न सुरक्षा कायदा सर्व राज्यांसाठी बंधनकारक!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कॉँग्रेसने आणलेला अन्न सुरक्षा कायदा हा भाजप सरकारलाही मोहिनी घालणारा ठरला असून या कायद्याची अंमलबजावणी देशातील सर्वच राज्यांनी करावी असा फतवा केंद्र सरकारने काढला आहे. यासाठी तीन महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे.

लोकसभा निवडणुका टप्प्यात असतानाच कॉँग्रेच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने अन्न सुरक्षा विधेयक आणले. मात्र, ही योजना लोकांपर्यंत पोहचवून त्याचा लाभ कॉँग्रेसला घेता आला नाही. या कायद्याची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे राज्य ठरले आहे. महाराष्ट्र, दिल्ली, हरियाना, छत्तीसगड या राज्यांमध्ये पूर्णत: तर राजस्थान, बिहार, हिमाचल, मध्यप्रदेश, पंजाब, चंदीगड, कर्नाटक, या राज्यात अन्न सुरक्षा योजना अंशत: राबविली जात आहे. मात्र, ही योजना अत्यंत प्रभावशाली असून ती लोकांपर्यंत पोहचायला पाहिजे असे धोरण भाजप सरकारनेही स्विकारले अूसन ज्या राज्यांनी ही योजना सुरु केली नाही त्यांना ती तीन महिन्यात सुरु करण्यात यावी.