आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Calling Gandhi Killer Nathuram Godase Patriot Bjps Sakshi Maharaj Apologises

नथुराम गोडसे \'राष्ट्रभक्त\': खा. साक्षी महाराजांची तीनदा माफी, संसदेत रणकंदन!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारताचे राष्ट्रपिता महत्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे याचा उल्लेख 'देशभक्त' असा केल्याने शुक्रवारी लोकसभेत विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला.

भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी तिनदा माफी मागितली. तरीदेखील विरोधक शांत झाले नाही. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी विरोधकांना शांतता पाळण्याचे आवाहन केले तरी देखील विरोधकांनी कामकाज सुरळीत चालू दिले नाही. 'उद्यापासून दररोज पाच मिनिटे फक्त माफी माण्यासाठी निर्धारित करावे काय?' असेही सुमित्रा महाजन यांनी म्हटले.

काँग्रेसचे खासदार आक्रमक झाले असून त्यांना संसदेत तसेच संसदेबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसच्या खासदारांनी काळे परिधान करून सरकार विरोधात घोषणा दिल्या.

भाजप खासदार साक्षी महाराज यांनी गुरुवारी नथुराम गोडसेला देशभक्ताची उपमा दिली होती. त्यानंतर सभागृहात विरोधकांनी प्रचंड गदारोळ करत सभागृहाचे कामकाज बंद पाडले होते.

दरम्यान, 15 नोव्हेंबर 1949 रोजी नथुराम गोडसेला फाशी देण्यात आली होती. दुसरीकडे, नवी मुंबईत 15 नोव्हेंबरला 'नथुराम गोडसे शौर्यदिन' साजरा करण्यात आल्याची माहिती कॉंग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी राज्यसभेत दिली. असा कार्यक्रम घेतला जातोच कसा? असा सवाल खासदार दलवाई यांनी उपस्थित केला होता.

'सभागृहाच्या बाहेर जे वक्तव्य केले होते. ते मी गुरुवारीच मागे घेतले होते. पुन्हा एकदा मी माझे शब्द मागे घेतो. नथुराम गोडसे याने महात्मा गांधींची हत्या केली होती. मात्र, कॉंग्रेसने 1984 मध्ये शिखांची निर्घृण हत्या करून महात्मा गांधींची पुन्हा एकदा हत्या केली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उद्धभवलेल्या शिख दंगलीला कॉंग्रेसच जबाबदार असल्याचा हल्लाबोल करून साक्षी महाराज यांनी नव्या वादाला तोंड फोडले. त्यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खडगे म्हणाले, संपूर्ण देश साक्षी महाराज यांची विनाशर्त माफी मागायला तयार आहे. नंतर पुन्हा साक्षी महाराज पुन्हा उभे राहुन म्हणाले, मी गांधीजींचा सन्मान करतो. माझे शब्द पुन्हा मागे घेतो. त्यावर विरोधकांनी पुन्हा जोरदार गदारोळ केला.