आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या अजेंड्यावर बिहार, नितीश कुमारांच्या पराभवासाठी आतापासून केली टीम सक्रिय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला धोबीपछाड देणा-या नरेंद्र मोदींनी आता बिहारमध्ये त्यांचे सर्वात मोठेविरोधक असणारे नितीश कुमारे यांना पराभूत करण्याची तयारी सुरू केली आहे. येथे पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. पण मोदींनी आतापासूनच त्यांची टीम सक्रिय केली आहे. त्यासाठी सर्वात आधी डाटा जमवण्यासाठी ते त्यांच्या खास टेक्नोसॅव्ही प्रोशेल्स आणि तज्ज्ञांच्या टीमची मदत घेत आहेत.
मोदींना पंतप्रधान बनवण्यात या टीमची महत्त्वाची भूमिका होती. आता मोदींनी याच टीमला बिहारच्या निवडणुकांशी संबंधित सर्व त्थ्यात्मक माहिती गोळा करण्याची जबाबदारी दिली आहे. त्याआधारावरच निवडणुकीची रणनीती ठरणार आहे. भाजप सप्टेंबरपासून बिहारमध्ये निवडणूक अभियान सुरू करण्याच्या तयारीत आहे.

आतापासूनच वातावरण निर्मिती
बिहारपूर्वी हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण पक्षातील नेत्यांच्या मते पुढच्या वर्षी होणा-या बिहारच्या निवडणुकांवर मोदींचे अधिक लक्ष आहे. ते स्वतः या निवडणुकांच्या तयारीवर नजर ठेऊन आहेत. त्यांच्या निर्देशानुसार भाजप प्रदेश कार्यकारिणीने 'मांगे बिहार, बीजेपी सरकार' अशा आशयाची पत्रके वाटण्यास सुरुवातही केली आहे.

मोदींमुळेच तोडले होते नाते
पंतप्रधानपदासाठी मोदींची उमेदवारी घोषित होताच नितीश कुमार यांनी गेल्यावर्षी भाजपशी 17 वर्षांपासून असलेले नाते तोडले होते. एका इंग्रजी वृत्तपत्राने एका नेत्याचा हवाला देऊन असे वृत्त प्रकाशित केले आहे की, बिहारच्या जदयू सरकारला सत्तेपासून दूर करण्याचे मोदींचे लक्ष आहे. त्यासाठी पक्षातील नेत्यांनी काम सुरू केले आहे, आणि सामान्य जनतेशी संपर्कही सुरू करण्यात आला आहे. त्यात ते सरकारच्या अपयशांचा पाढा वाचत आहेत. प्रदेशाध्यक्ष मंगल पांडेय यांच्या मते जदयू आणि राजद यांची आघाडी भाजपच्या फायद्याची ठरणार आहे. जे लोक लालूंवर नाराज होते, त्यांनी नितीश यांना समर्थन दिले होते. पण आता या आघाडीनंतर जनता त्यांना माफ करणार नाही. त्याचे कारण म्हणजे राजदच्या काळातील दहशत अजूनही लोकांच्या मनात आहे.

राजनाथ यांना हवा 'बीजेपी कॉरीडोर'
भाजप अध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह हेही झारखंडमध्ये भाजपची सत्ता स्थापन झाल्याने एका वेगळ्या दृष्टीकोनातून या सर्व बाबींकडे पाहत आहेत. बिहारपासून छत्तीसगडपर्यंत पसरलेल्या माओवादी आणि नक्षलवाद्यांच्या 'रेड कॉरीडोर' ला 'बीजेपी कॉरीडोर' मध्ये परावर्तित केल्यास राष्‍ट्रीय स्‍तरावर नक्षलवाद्यांच्या समस्येचा निपटारा करणे सोपे जाणार असल्याची आशा त्यांना आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांची नक्षल्यांविरोधातील रणनीती प्रत्यक्षात आणण्यात झारखंड आणि बिहार हेच मोठे अडथळे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांत भाजपचे सरकार असेल तर नक्षलवाद्यांच्या समस्येचा निपटारा करणे सोपे जाईल, असे त्यांचे मत आहे.
गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याच्या मते, ' गेल्या 17 महिन्यांमध्ये बिहारमध्ये केवळ एक नक्षलवाद्याला ठार करता आले आहे. तर याच काळात राज्यात नक्षलवाद्यांनी 86 सामान्य नागरिक आणि सुरक्षारक्षकांचे प्राण घेतले आहेत. जदयू सरकार नक्षलवाद्यांच्या विरोधात कडक भूमिका घेत नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.