आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लष्कराने केले ‘स्वच्छ एलआेसी’ : व्यंकय्या नायडू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय सुरक्षा दलाने ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या माध्यमातून ‘स्वच्छ एलआेसी’ मोहीम राबवली आहे, असे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.

आपले शेजारी राष्ट्र दहशतवादाला पोसत आहे. निधी देत आहे. त्यांची निर्यात करू लागले आहे. त्यांच्या या कृतीला आपल्या सैन्याने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. स्वच्छ मन, स्वच्छ धन, स्वच्छ तन आणि आता स्वच्छ सीमा, स्वच्छ नियंत्रण रेषाही स्वच्छ करण्यात यश आले आहे. भारत स्वच्छ अभियानासाठी सर्वांनाच एकत्र यावे लागणार आहे, असे माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांनी सांगितले. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नायडू बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत व स्वच्छाग्रही होण्याचे आवाहन केले आहे. त्याला सर्वांनी प्रतिसाद द्यायला हवा. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याचा नारा दिला होता. त्यात सहभागी झालेल्यांना सत्याग्रही म्हटले जायचे. आता पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने स्वच्छाग्रही होण्याची वेळ आली आहे, असे नायडू म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...