आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'फोर्ड\'च्‍या वादग्रस्‍त जाहिरातीवरुन वादळ, कारमध्‍ये दाखविल्‍या बांधलेल्‍या महिला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फोर्ड या कार निर्मात्‍या कंपनीवर जाहिरातीतून महिलांवर होणा-या हिंसेला प्रोत्‍साहन देण्‍याचा आरोप करण्‍यात आला आहे. 'फिगो' या मॉडेलसाठी कंपनीने एक जाहिरातीचे पोस्‍टर छापले होते. त्‍यात तीन महिलांना कारच्‍या बॅकसिटच्‍या मागे बांधनू नेण्‍यात येत असल्‍याचे दाखविण्‍यात आले होते. एवढेच नव्‍हे तर बुंगा-बुंगा पार्टीसाठी कुख्‍यात ठरलेले इटलीचे माजी पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्‍कोनी यांना गाडी चालवितना आणि कुत्सितपणे हास्‍य करीत असल्‍याचे दाखविले आहे. ही जाहिरात बनविणा-या एजेंसीने यासंदर्भात माफी मागितली आहे.

नुकतेच एका संस्‍थेने जगभरातील 100 वादग्रस्‍त आणि अश्लिल जाहिरातींची यादी जाहीर केली आहे. एकीकडे बिल गेट्स पुढच्‍या पिढीसाठी आधुनिक कंडोम बनविण्‍यासाठी स्‍पर्धा घेत आहेत. तर 'मिस‍ रिप्रेझेंटेशन' नावाची संस्‍था महिलांचे शोषण करणा-या जाहिरातींविरुद्ध मोहिम राबवित आहे. त्‍यातच या जाहिरातींवरुन वाद निर्माण झाला.

फोटो- 'फोर्ड फिगो' ची वादग्रस्‍त ठरलेली हीच ती जाहिरात.