आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुषमा स्वराज इस्लामाबादमध्ये दाखल, नवाज शरीफ यांना भेटणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज इस्लामाबादमध्ये दाखल झाल्या आहेत. या दौऱ्यात त्यांची पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी भेट होण्याची शक्यता आहे.
इस्लामाबादेत होणार असलेल्या हार्ट ऑफ एशिया परिषदेत त्या सहभागी होतील. त्यांच्यापूर्वी 2012 मध्ये तत्कालीन परराष्ट्र मंत्री असलेले एस एम कृष्णा यांनी इस्लामाबाद दौरा केला होता. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये व्हिसा करार झाला होता.

8 दिवसांत भारत पाक नात्यांच्या वातावरणात बदल, सुषमांचा दौरा महत्त्वाचा कसा...
- 30 नोव्हेंबरला पॅरिसमध्ये क्लायमेट चेंज समिटदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात भेट झाली होती.
- गेल्या रविवारी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि पाकचे नसीर जंजुआ यांची थायलंडमध्ये भेट झाली.
- सुषमा मंगळवारी इस्लामाबादला जातील. त्याठिकाणी त्या नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अजिज यांची भेटही घेतील.

पाकिस्तानला का जात आहेत सुषमा?
- सुषमा स्वराज इस्लामाबादेत होणाऱ्या पाचव्या 'हार्ट ऑफ एशिया' परिषदेत सहभागी होण्यासाठी जात आहेत. या समिटमध्ये 25 देशांचे नेते उपस्थित असणार आहेत.
- कॉन्फरन्मध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानकडून भारताला आमंत्रित करण्यात आले होते.
- त्यात अजरबैजान, चीन, ईराण, कझाकिस्तान, किर्गीस्तान, रशिया, सौदी अरब, ताजिकिस्तान, तुर्कस्तान आणि तुर्कमेनिस्तान यांचे परराष्ट्र मंत्री सहभागी होणार आहेत.
- पुढची परिषद अफगानिस्तान होणार आहे. त्याची तारीख ठरलेली नाही. त्यामुळे परराष्ट्र मंत्री काबूलला गेले आणि इस्लामाबादला जाणे टाळले तर डिप्लोमॅटिक अडचणी निर्माण होऊ शकतात.
- त्यामुळे सुषमा स्वराज यांना पाठवले जात आहे. या परिषदेत अफगाणिस्तान आणि दहशतवादावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे.

दौऱ्यातून अपेक्षा
- पाकिस्तान परिषदेचे आयोजन करत आहे. सुत्रांच्या मते सुषमा आणि नवाज तसेच अजिज यांची भेट ‘कर्टसी कॉल’ समजली जायला हवी. दहशतवादाच्या मुद्यावर भारताची भूमिका अजूनही गंभीर आहे.
- परिषदेच 25 देशांचे नेते सहभागी होणार आहेत.
पुढील स्लाईडवर वाचा, भारत-पाक नात्यातील ताज्या घडामोडी...