आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Foreign Policy | National Security Consultants Meeting In New Delhi On August 23 24

परराष्ट्र धोरण: पाकमधील दाऊदच्या नव्या ठिकाणांचे भारत पुरावे देणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद /नवी दिल्ली - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या (एनएसए) पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत भारत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या वास्तव्याच्या नव्या ठिकाणांचे पुरावे पाकिस्तानला देणार आहे. दाऊदला तेथे दडवून ठेवण्यात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसअायचे संरक्षण मिळत आहे. त्याचेही पुरावे भारतातर्फे दिले जाण्याची शक्यता आहे. माध्यमांमध्ये यांसंदर्भात आलेल्या वृत्तांमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. भारत आणि पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये नवी दिल्ली येथे येत्या २३ व २४ ऑगस्टरोजी बोलणी होणार आहेत.

पाकिस्तानच्यावतीने या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यात्रेदरम्यान भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दाऊदसंदर्भात एक डॉजियर यूएईला साेपवले आहे. तशाच प्रकारचे डॉजियर अजीज यांनाही सोपवले जाणार आहे. पाकमधील तज्ज्ञांनी मात्र या बैठकीत दाऊद इब्राहिमऐवजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा व त्यासंदर्भात मास्टर माइंड जकी उर रहमान लखवी याच्या जामिनाचा मुद्दा भारताकडून उचलला जाईल, असे गृहीत धरले आहे. पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांत वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सातत्याने गोळीबार केला जात आहे. त्यात काही जवान व नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तो मुद्दाही या बैठकीत उपस्थित होऊ शकतो, असे तज्जांचे म्हणणे आहे.

२०१२ पासून दाऊद आयएआयच्या संरक्षणात
माध्यमांच्या अहवालानुसार भारतीय गुप्तचर यंत्रणांनी आता दाऊच्या नव्या चार सुरक्षित घरांबाबत माहिती व पुरावे गोळा केले आहेत. येथे दाऊद २०१२ पासून राहत आहे. ताज्या डॉजियरमध्ये त्याचा उल्लेख आहे. यापैकी एक घर सेफ हाऊस मुरीमध्ये आहे व ते इस्लामाबादपासून अवघ्या २० किलोमीटरवर आहे. भारताने २०१२ मध्ये इस्लामाबादेत भारताने दाऊदच्या तीन घरांची यादी पाकला सोपवली होती. ही ठिकाणे कराचीमध्ये आहेत. या ठिकाणांची माहिती मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आरोपी याकूब मेमनने दिली होती.
याकूबला गेल्याच महिन्यात फासावर लटकवण्यात आले होते.
शरीफ यांच्याकडून अजेंडा मंजूर
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये होणाऱ्या चर्चेच्या अजेंड्याला सोमवारी रात्री उशीरा मंजुरी दिल्याचे वृ़त्त आहे. यानुसार पाकिस्तान चर्चेदरम्यान बलुचिस्तान, कराची व इतर आदिवासीबहुल भागात झालेले हल्ले व इतर घडामोडींत भारताच्या कथित सहभागाचा मुद्दा उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भारत नियंत्रण रेषेवर गोळीबार करत असल्याचा पाकचा आरोप असून तोही चर्चेत त्यांच्याकडून उपस्थित केला जाऊ शकतो. तसेच बैठकत पाकिस्तानकडून आयएसअाय व दाऊद इब्राहिमचे भारताचे मुद्दे खोडून काढून बचाव केला जाण्याची शक्यता आहे.
गुरुदासपूर हल्ल्याचा मुद्दा येणार
भारतात पंजाबमध्येय गुरुदासपूर येथे पोलिस ठाण्यावर झालेला दहशतवादी हल्ला, जम्मू काश्मीरमध्ये होणारी दहशतवाद्यांची घुसखोर तसेच एका पाकिस्तानी दहशतवाद्याला झालेली अटक आदी मुद्दे चर्चेत उपस्थित राहणार आहेत. जम्मू - काश्मीर व मुंबई हल्ल्यातील आरोपींना सुरक्षा यंत्रणेच्या ताब्यात द्यावे व त्यांच्याविरुद्धचे खटले लवकर निकाली काढावेत, असा आग्रह धरला जाऊ शकतो. खटल्यांच्या सुनावणीत होत असलेल्या विलंबाचा मुद्दाही भारताकडून उपस्थित केला जाऊ शकतो.