आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Foreign Secretary Said We Will Talk To Pak But Time, Place To Be Of India’S Choice

LoC पारकरुन हल्ला करण्यात काही गैर नाही, भारताला स्व-संरक्षणाचा पूर्ण हक्का - US राजदूत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय लष्कराने एलओसी पार करुन केलले सर्जिकल स्ट्राइक योग्य असल्याचे भारतातील अमेरिकेचे राजदूत रिजर्ड वर्मा यांनी म्हटले आहे. दहशतवादाच्या मुद्यावर अमेरिका नेहमीच भारतासोबत असल्याचेही ते म्हणाले. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत वर्मा यांनी उरी हल्ल्यापासून दोन्ही देश कायम संपर्कात असल्याचे म्हटले आहे. अमेरिका प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून होती, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. त्यासोबत अमेरिकेकडून पाकिस्तानला दिल्या जाणार्या मदतीत 73% कपात करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
- इंग्रजी दैनिक 'द हिंदू'ला दिलेल्या मुलाखतती रिचर्ड वर्मा यांनी अनेक मुद्द्यांवर मत व्यक्त केले. वर्मांनी सांगितले की उरी हल्ला झाला तेव्हा ते अमेरिकेत होते. येथील नाजूक परिस्थिती पाहून ते लगेच भारतात परत आले होते.
- वर्मा म्हणाले, हल्यानंतर भारत आणि अमेरिकचे एनएसए आणि परराष्ट्र मंत्री एकमेकांच्या संपर्कात होते. अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने भारताला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. आम्हाला माहित होते की भारत क्रॉस बॉर्डर टेरेरिझमचा शिकार आहे.
पुढील स्लाइडमध्ये, परराष्ट्र सचिव म्हणाले- सर्जिकल स्ट्राइक यापूर्वीही झाले, सरकार कडून वाच्यता प्रथमच
बातम्या आणखी आहेत...