आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Foreigner Woman Slapped Security Officer Of Manmohan Singh

VIDEO: विदेशी महिलेने मनमोहनसिंग यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या कानाखाली वाजवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- डब्ल्यूडब्ल्यूएफ ऑडिटोरियममध्ये माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार होते. यावेळी एक विदेशी महिला कार्यक्रमाला उशीरा आली. त्यामुळे मनमोहनसिंग यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याने तिला आत सोडले नाही. यावरुन ही महिला सुरक्षा अधिकाऱ्यावर चांगलीच भडकली. तिने या अधिकाऱ्याच्या कानाखाली वाजवली.
सुरक्षा अधिकाऱ्याला मिळालेली वागणूक बघून मुख्य गेट शेजारी उभा असलेला एक तरुण समोर आला. त्याने महिलेला चांगलेच दटावले. तरीही ही महिला तेथून जाण्यास तयार नव्हती. पण तरुण आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. अखेर ती गर्दीत दिसेनाशी झाली.
विजय वर्मा यावेळी घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी याचे मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली आहे.