आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Forensic Test Reveals Two Out Of Seven Videos On JNU Were Doctored

JNU: कन्हैया अाज \'तिहार\'बाहेर येणार, \'देशद्रोहा\'त केजरी सरकारची क्लीन चिट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता कन्हैयाकुमारला दिल्ली हायकोर्टाने सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आज (गुरुवारी) तिहार तुरूंगातून तो बाहेर पडेल. दुसरीकडे, देशविरोधी घोषणाबाजी केल्याप्रकरणात दिल्ली सरकारने कन्हैयाला 'क्लीन चिट' दिली आहे.
कन्हैयाला 10 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकेच्या 19 दिवसांनी जामीन मिळाला. 12 फेब्रुवारीला कन्हैयास अटक झाली होती. यामुळे देशविरोधी ठरेल, अशा कार्यक्रमांत तो सहभागी होऊ शकणार नाही. त्याला चौकशीत सहकार्य करावे लागेल. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी हा जामीन म्हणजे काही नवा प्रकार नाही, असे म्हटले आहे.

'विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारचा संसर्ग वाढतो आहे. हा आजार वाढण्यापूर्वीच थांबवला पाहिजे. प्रतिजैविकाने गुण येत नसेल तर त्यापुढील उपचार सुरू केला जातो. अनेकदा शस्त्रक्रियेची गरज पडते. न्यायालयीन कोठडीत असताना कन्हैयाने याचा विचार केला असेल, अशी आशा असल्याचे न्यायमूर्ती प्रतिभा राणी यांनी निकाल देताना म्हटले आहे. कन्हैयाला याप्रकरणी दिल्ली पोलिसांना सहकार्य करावे लागेल, असेही कोर्टाने म्हटले आहे.

दरम्यान, याप्रकरणातील इतर आरोपी उमर खालिद व अनिर्बान भट्टाचार्यला दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जेएनयू परिसरात देशविरोधी घोषणा दिल्याचे आरोप दोघांनी नाकारले आहे.

तिरंग्याची शान राखण्यास ‘उपकार’च्या गीताचा दाखला
‘रंग हरा हरि सिंह नलवे से, रंग लाल है लाल बहादूर से, रंग बना बसंती भगतसिंह, रंग अमन का वीर जवाहर से, मेरे देश की धरती...!’ उपकार चित्रपटातील या गीतात मातृभूमीप्रनि प्रेमाचे विविध रंग अाहेत. असे वातावरण असताना ‘जेएनयू’मध्ये शांतीचा बेरंग झालाच कसा?
‘जेएनयू’ विद्यार्थ्यांच्या मनात देशद्राेहाचे विचार का अाले?
जेएनयूमध्ये देशद्राेही घाेषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात असे विचार का अाले, याची माहिती शिक्षकांनी घ्यावी. पुन्हा असे प्रकार घडू नयेत म्हणून जबाबदार व्यक्तींनी पुढाकार घ्यावा. देशासाठी समर्पित हाेणाऱ्यांच्या कुटुंबावर ‘अशा’ घाेषणाबाजीमुळे विपरीत परिणाम हाेत असताे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य अाहे, तशी जबाबदारीही दिलीय
प्रत्येकाची वेगळी भूमिका असू शकते. पण संविधानाच्या मर्यादेत. विविधतेतून एकता हाच भारताचा अादर्श अाहे. संविधानाच्या कलम 19 (2) नुसार जसे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अाहे तशी बंधनेही अाहेत.
घाेषणा देणारे सियाचीनमध्ये तासभरही उभे राहणार नाहीत
सर्वात उंच युद्धभूमीवर अामचे जवान तैनात अाहेत. जिथे पुरेसा अाॅक्सिजनही नाही. त्यांच्यामुळेच घाेषणा देणाऱ्यांना इथे सुरक्षित वातावरण मिळते. अफझलचे पाेस्टर घेऊन घाेषणा देणारे तिथे एक तासही उभे राहतील?

पुढील स्लाइडवर वाचा, आमच्याकडे कन्हैयाविरुद्ध ठोस पुरावे