आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथमच नक्षलींच्या मुकाबल्यासाठी जंगलात उतरवल्या महिला कमांडो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आता नक्षलींच्या मुकाबल्यासाठी महिला कमांडो जंगलात उतरणार आहेत. हिंसक संघर्षाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) एक पथक छत्तीसगडमधील बस्तर आणि दुसरे झारखंडमध्ये तैनात करण्यात आले आहे.
महिला कमांडोंची ही पथके सध्या नवीन आहेत. एका पथकात 35 कमांडो आहेत. आतापर्यंत लष्करी धोरणानुसार महिला अधिकारी किंवा सैनिकांना शत्रूशी थेट सामना करावा लागेल, अशा ठिकाणी तैनात केले जात नव्हते, परंतु पहिल्यांदाच या नियमात शिथिलता आणून त्यांना नक्षलग्रस्त भागात तैनात करण्यात आले आहे. या भागात सातत्याने नक्षलींशी संघर्ष करावा लागतो.
पाच वर्षांत दोन हजार महिलांचा समावेश होणार
सर्वपोलिस आणि अर्धसैनिक दल मिळून सीआरपीएफकडे सध्याच्या स्थितीत सर्वाधिक महिला सैनिक आहेत. सीआरपीएफमध्ये आगामी पाच वर्षांत आणखी हजार महिला शिपायांची भरती होणार आहे. सध्या तीन हजार सैनिक आहेत. भरतीनंतर संपूर्ण दलामध्ये पाच हजार महिला सैनिक होतील.
उद्देश: गुप्त माहिती काढण्यासाठी मदत
महिलांतैनातीच्या साह्याने गुप्त माहिती मिळवणे शक्य होणार. सुरक्षा दल ग्रामीण भागातील लोकांशी जवळीक साधणार.

महिला सैनिक स्थानिक लोक आणि आदिवासी महिलांशी चांगल्या प्रकारे मैत्री करू शकतील, असे लष्करी अधिका-यांना वाटते. मानवी हक्काच्या उल्लंघनाच्या घटना रोखण्याचीही सुरक्षा दलास आशा.
पुढील स्‍लाईडवर पाहा महिला कमांडोच्‍या ट्रेनिंगचे छायाचित्रे...