आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AAP ला आणखी एक धक्का, विनोद बिन्नीही भाजपमध्ये, शिसोदियांना आव्हान देणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीशी संबंध असलेले आणखी एक नेते विनोद कुमार बिन्नी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रविवारी दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष सतीष उपाध्याय यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाची सदस्यता स्वीकारली. दरम्यान आप नेत्यांच्या भाजप प्रवेशावर काँग्रेसचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लव्हली यांनी चिमटा काढला आहे. आता केजरीवाल कधी भाजपमध्ये प्रवेश करणार असे ते म्हणाले आहेत.
गेल्या निवडणुकीत लक्ष्मीनगर मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या उमेदवारीवर आमदार बनलेल्या बिन्नी यांनी गेल्यावर्षी केजरीवाल यांच्याशी मतभेद निर्माण झाल्यानंतर आपला रामराम केला होता. त्याआधी नुकत्याच शाजिया इल्मी आणि किरण बेदी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता.

शिसोदियांच्या विरोधात मैदानावर उतरण्याची शक्यता
पक्षात प्रवेश केल्यानंतर बिन्नी म्हणाले की, मते मिळवण्यासाठी केजरीवाल यांनी लोकांच्या भावनांशी खेळ केला. त्याआधी बिन्नी यांनी शनिवारी सतीष उपाध्याय यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी बिन्नी यांनी अपक्ष म्हणून उभे राहून थेट केजरीवालांना आव्हान देणार असल्याचे म्हटले होते. मात्र, आता पटपडगंज येथून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सध्या आपतर्फे मनीष शिसोदिया यांना याठिकाणाहून उमेदवारी देण्यात आली आहे.