आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Former Air Force Chief Tyagi Arrested, CBI VVIP Helicopter Scam, Two More Arrested

माजी हवाईदलप्रमुख त्यागी गजाआड, व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यात सीबीआयची कारवाई, आणखी दोन अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : ३६०० काेटी रुपयांच्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी सीबीआयने माजी हवाईदलप्रमुख एस.पी. त्यागी यांच्याशिवाय दोन अन्य व्यक्तींना अटक केली. त्यागी यांची याआधी दीर्घ चौकशी करण्यात आली होती.
माजी हवाईदलप्रमुखांशिवाय सीबीआयने त्यांचे चुलत भाऊ संजीव ऊर्फ जूली त्यागी व वकील गौतम खेतान यांनाही अटक केली. सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रथमच एखाद्या प्रकरणात एवढ्या मोठ्या पदावरील अधिकाऱ्याची अटक झाली आहे. ऑगस्टा वेस्टलँडसाठी हेलिकॉप्टर बनवणाऱ्या फिनमेक्कॅनिका कंपनीशी १२ व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरचा करार केंद्र सरकारने २०१४ मध्ये रद्द केला होता.
या प्रकरणाच्या चौकशीत करारासाठी मोठ्या रकमेची देवाण-घेवाण झाल्याचे समोर आले. सीबीआयने त्यागींशी दलालांशी कथित संबंध, त्यांचे इटली दौरे, हेलिकॉप्टरसाठी अटीत बदल व त्यांच्या चुलत भावासोबतच्या संबंधावरून प्रश्न विचारले होते. चौकशीत त्यागी यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याचे मान्य केले होते.
बातम्या आणखी आहेत...