आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंह यांचे घुमजाव; शिंदेची नावे जाहीर करण्याची तर अब्दुल्लांची सीबीआय चौकशीची मागणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंह पुन्हा अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत. जम्मू काश्मिरमध्ये लष्कराने कोणत्या मंत्र्यांना पैसे दिले याची माहिती माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंह यांनी द्यावी, सरकार त्यांची चौकशी करेल असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे. तर, केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला यांनी सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

एक इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्ही.के.सिंह यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जम्मू-काश्मिरमधील मंत्र्यांना पैसे दिले जात असल्याचा गौप्यस्फोट केला होता. जम्मू-काश्मिरमध्ये अनेक विकासाची काम करण्यासाठी लष्कर मंत्र्यांना पैसे देते असे सिंह म्हणाले होते. ही कामे कायद्याच्या चौकटीत राहून करता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. या प्रकरणाची चौकशी सरकार करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी गृहमंत्री शिंदें यांना आज (मंगळवार) विचारला. त्यावर शिंदेंनी, सिंह यांनी नावे जाहीर करावी सरकार त्यांची चौकशी करेल, असे सांगितले.