आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Army Chief V K Singh In Nana Patekar\'s Movie

VIDEO: नाना पाटेकरांच्या चित्रपटात माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी लष्कर प्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी नाना पाटेकर यांच्या प्रहार चित्रपटात काम केल्याची तुम्हाला माहिती आहे...
'आर्य क्रांती' या युजरने युट्यूबवर टाकलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये व्ही. के. सिंह लष्करी अधिकाऱ्याच्या गणवेशात दिसतात. 1991 मध्ये आलेल्या 'प्रहार : द फायनल अटॅक' या चित्रपटातील दृष्य या व्हिडिओत दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, माधुरी दीक्षित आणि डिंपल कपाडीया यांची प्रमुख भूमिका होती.
या चित्रपटाचे कथानक नाना पाटेकर या लष्करी अधिकाऱ्याभोवती फिरते. त्यांच्या टीममधील एका कमांडोची काही गुंड हत्या करतात. त्यानंतर नाना या गुडांना धडा शिकवत समाजाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो. यावेळी तो एका लष्करी अधिकाऱ्यासोबत चर्चा करताना दिसतो. हा लष्करी अधिकारी व्ही. के. सिंह यांची नानांना ओळख करुन देतो, असा दावा करण्यात आला आहे.
चर्चा सुरु असताना लष्करी अधिकारी नानांना सांगतो, की हमे उस जगह की कुछ स्लाईड्स मिली हैं. कर्नल व्ही. के. सिंह तुम्हाला अधिक माहिती देतील.
फस्टपोस्टमध्ये आलेल्या वृत्तानुसार, व्ही. के. सिंह यांनी सांगितले होते, की त्यांना खऱ्या लष्करी अधिकाऱ्याची आवश्यकता होती. त्यामुळे मी होकार दिला होता.
वयावरुन वाद झाल्यानंतर माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह यांच्या नेतृत्वातील काही लष्करी तुकड्यांनी सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप कॉंग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केला आहे. त्यामुळे सिंह सध्या चर्चेत आले आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, नाना पाटेकर यांच्या प्रहार चित्रपटातील व्ही. के. सिंह यांचा कॉमियो रोल....