आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मांझींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, लालूंची आहे पक्षप्रवेशाची ऑफर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बिहारच्या राजकीय पटलावर वेगाने घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी आज (गुरुवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मोदी आणि मांझी यांच्यात बिहारच्या राजकीय समीकरणाबद्दल चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान मांझी आज भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांनी मांझींना पक्षात येण्याचे खुले आवाहन केले होते. या ऑफरवर मांझी म्हणाले, 'लालू यादवांनी नितीशकुमारांसोबतची आघाडी तोडली तरच मी त्यांच्यासोबत जाईल. मला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केल्यानतंरच लालूंसोबत आघाडी होऊ शकते.' काही महिन्यांपूर्वीच मांझींना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. त्यासोबतच नितीशकुमारांमुळे त्यांची जनता दल (संयुक्त) पक्षातूनही (जेडीयू) हकालपट्टी करण्यात आली आहे. आगामी सप्टेबर - ऑक्टोबरमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे तिथे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
मांझी एवढे महत्त्वाचे कसे ?
जातीय समीकरणामुळे बिहारचे माजी मुख्यमंत्री महादलित नेते जीतनराम मांझी यांच्यासाठी सर्वच पक्ष गळ टाकत आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जेडीयूला 25 टक्के महादलित समाजाचे मतदान झाले होते. यात मांझी यांचा वाटाही महत्त्वाचा होता. मांझी मुसहर जातीचे आहेत. या समाजाचे गया, जहानाबादसह बिहारमधील 30 जागांवर निर्णायक मतदान आहे. याशिवाय शाहाबाद, चम्पारण येथील डझनभर जागांवरही या समाजाचा प्रभाव आहे. मांझी भाजप सोबत गेले किंवा स्वतंत्र लढले तरी दोन्ही बाजूने फायदा भाजपचाच आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भेटलो पंतप्रधानांना - मांझी
दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर मांझींनी त्याबद्दल माध्यमांना माहिती देण्याचे टाळले. ते फक्त एवढेच म्हणाले, की मी 25 ते 29 मे दरम्यान भेटीसाठी वेळ मागितला होता. त्यांनी मला वेळ दिला त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. कोणत्याही राजकीय विषयावर आमची चर्चा झाली नाही. बिहारच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, हाच आजच्या भेटीचा उद्देश होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच बिहारमधील शेतकरी आत्महत्या करत आहेत. या समस्येची तीव्रता पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिली.
बातम्या आणखी आहेत...