आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IAS ची मुलासोबत आत्‍महत्‍या, लाचखोरीच्‍या आरोपात होता अटक, आधी पत्‍नी-मुलीची आत्‍महत्‍या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भष्‍ट्राचाराचा आरोप असेलेले माजी सनदी अधिकारी बी.के.बंसल यांनी मंगळवारी त्‍यांच्‍या मुलासोबत आत्‍महत्‍या केली आहे. मिळालेल्‍या माहितीनुसार, दोघांचे मृतदेह मधू विहारमध्‍ये त्‍यांच्‍या घरासमोर मिळाले आहेत. घटनास्‍थळावरून सुसाइड नोटही मिळाली आहे. ऑगस्‍ट महिन्‍यात बंसल यांची जामिनावर सुटका झाली होती. जेव्‍हा बंसल यांना अटक झाली होती, तेव्‍हा त्‍यांची पत्‍नी सत्‍यबाला आणि मुलगी नेहा यांनीही आत्‍महत्‍या केली होती.
बंसल यांच्‍यावर 9 लाख रुपयांची लाच घेतल्‍याचा आरोप होता..
- सीबीआयने बंसल यांना 16 जुलै रोजी रंगेहाथ लाच घेताना अटक केल्‍याचा दावा केला होता.
- दिल्‍लीच्‍या एका हॉटेलात फार्मा कंपनीकडून लाच घेताना सीबीआयने अटक केले होते.
- बंसल हे कॉरपोरेट अफेयर्स मिनिस्ट्रीमध्‍ये एडिशनल सेक्रेटरी दर्जाचे अधिकारी होते.
CBI ने केली होती छापेमारी..
- बंसल यांना अटक केल्‍यानंतर पोलिसांनी त्‍यांच्‍या आणि त्‍यांच्‍या नातेवाईकांच्‍या घरी छापेमारी केली होती.
- CBI ने केलेल्‍या छापेमारीत बंसल यांच्‍या अपार्टमेंट्समधून 60 लाख रुपयांची रोख मिळाली होती.
- 20 प्रॉपर्टी पेपर आणि 60 बँक खात्‍यांचे डिटेल्‍सही येथे मिळाले होते.
- ऑगस्‍ट महिन्‍यात बंसल यांनी त्‍यांच्‍या मुलाची मानसिक स्‍थिती खराब असल्‍याचे सांगून बेलची मागणी केली होती.
- बंसल तुरुंगात होते तेव्‍हा त्‍यांची पत्‍नी आणि मुलीने आत्‍महत्‍या केली होती.
- बंसल यांना अटक झाल्‍यानंतर आता जगण्‍यात काही अर्थ नाही असे त्‍यांची मुलगी म्‍हणत होती.
पुुढे पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...