आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांचे निधन, बलात्कार प्रकरणात आरोपींचे वय आणले 16 वर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - सर्वाेच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांचे येथे रुग्णालयात निधन झाले. ६८ वर्षीय कबीर यांना मूत्रपिंड आणि त्यासंबंधित आरोग्याच्या तक्रारी होत्या. दुपारी २.५२ वाजता निधन झाल्याची माहिती हॉस्पिटल सूत्रांनी दिली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, जावई व मुलगा असा परिवार आहे. २९ सप्टेंबर २०१२ रोजी कबीर यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. 
 
जस्टिस पी. सदाशिवम यांच्यानंतर ते सुप्रीम कोर्टाचे 39वे सरन्यायाधिश होते. सुप्रीम कोर्टातील 8 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी 681 ऑर्डर आणि निर्णय दिले होते. त्यात प्रामुख्याने बलात्कार प्रकरणातील अल्पवयीनांचे वय कमी करण्याचा आणि वैद्यकीय-दंत शल्यचिकित्सा (डेंटल) प्रवेशासाठी NEET लागू करण्याचा निर्णय होता. जस्टिस कबीर यांचा जन्म 19 जुलै 1948 मध्ये कोलकाता येथे झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण पश्चिम बंगालमध्ये झाले होते. 
 
- दिल्लीतील निर्भया बलात्कार कांडानंतर (डिसेंबर 2012) अशा आरोपांतील अल्पवयीन आरोपींच्या वयाचा प्रश्न समोर आला होता. जुवेनाइल अॅक्टमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. 
- बलात्कार प्रकरणात 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेले अल्पवयीन आरोपी समजले जात होते. त्यांचे वय कमी करुन ते 16 वर्षे करण्याची ऑर्डर जस्टिस कबीर यांनी दिली होती. 
- प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपती पदी नियुक्तीला माजी लोकसभाध्यक्ष पी.ए.संगमा यांनी आव्हान दिले होते. संगमा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर संविधानपीठाने सुनावणी केली. त्या पीठाचे एक सदस्य जस्टिस कबीर होते.
- 18 जुलै 2013 रोजी जस्टिस कबीर यांनी मेडिकल आणि डेंटल कौन्सिलच्या नोटिफिकेशनला बाजूला सादर राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (NEET) लागू करण्याचा आदेश दिला होता. हा त्यांचा कारकिर्दीतील अखेरचा निर्णय ठरला. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...