आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेएनयूचे प्राध्यापक गिलानींना जामीन, भारतविरोधी घोषणा प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठातील माजी प्राध्यापक एस. ए. आर. गिलानी यांना दिल्ली सत्र न्यायालयाने शनिवारी जामीन दिला. पोलिसांनी गिलानी यांच्या जामिनाला विरोध केला. भारतविरोधी घोषणाबाजी देशद्रोह असल्याचा युक्तिवाद पोलिसांनी केला. या प्रकरणात माध्यमांमध्ये प्रसिद्ध व्हिडिओ चित्रणाच्या आधारे आपण स्वत:हून कारवाई केली असल्याचेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले. यापूर्वी १९ फेब्रुवारी रोजी न्यायदंडाधिकाऱ्यांनी प्रा. गिलानी यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. प्रेस क्लबमध्ये देशविरोधी घोषणाबाजी केल्याचा आरोप गिलानींवर होता.