आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Hockey Player Paragat Money Packet Curried

माजी हॉकीपटू परगटचे चोरलेले पाकिट कुरियन मिळाले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर - भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार आणि कँटचा आमदार परगटसिंगच्या पाकिटावर चोरट्याने डल्ला मारला. चोरट्याने त्यातून 8 हजार रुपये काढून घेतले आणि पाकिटासह उरलेले सर्व सामान चक्क कुरियरने परत पाठवून दिले. हंसराज स्टेडियमवर 21 मे रोजी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना परगटच्या कुर्त्यातील पाकीट चोरट्याने लंपास केले. त्यात 8 हजार रुपये रोख, आमदारकीचे ओळखपत्र, पॅन कार्ड, तीन एटीएम कार्ड, खरेदीची काही बिले होती. बुधवारी त्याच्या घरी एक कुरियर आले त्यात हरवलेले पाकीट होते. त्यावर पाठवणा-याचे नाव, पत्ता असा कोणताही तपशील नव्हता.