आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former IB Director Blames Congress Leader And A CBI Officer In Ishrat Jahan Case

IB च्‍या माजी अधिका-याचा दावा- इशरत एन्‍काऊंटरमध्‍ये मला अडकवण्‍याचा प्रयत्‍न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - गुप्तचर विभागाचे माजी विशेष संचालक राजेंद्र कुमार यांनी दावा केला आहे की, इशरत जहाँ एन्काऊंटरमध्ये मला अडकवण्‍यासाठी माझ्यावर दबाव आणला जात होता. मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड डेव्हिड हेडलीने इशरत जहाँ ही लष्कर ए तोयबाची हस्तक होती असे सांगितले. त्‍यानंतर कॉंग्रेस आणि भाजपाने एकमेकांवर आरोप लावणे सुरू केले. कुमार म्‍हणाले- शासन व न्‍यायालयाकडे तक्रार करीन..
-इंग्रजी वृत्‍तपत्र ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्‍या मुलाखतीत राजेंद्र कुमार यांनी 2004 च्‍या इशरत जहाँ एन्काऊंटरबाबत महत्‍त्वाची खुलासे केले आहेत.
- कुमार म्‍हणाले, सीबीआयचे एक मोठे अधिकारी व कॉंग्रेसमधील एक दिग्‍गज नेते मला या ‘फेक एन्‍काऊंटर’ अडकवण्‍याच्‍या प्रयत्‍नात होते.
- मात्र, कुमार यांनी सध्‍या त्‍या नेत्‍याचे उघड करण्‍यास नकार दिला आहे.
आणखी काय म्‍हणाले कुमार?
- “ शासन किंवा न्‍यायालयापुढे मांडण्‍यासाठी मी पुरावे एकत्र करत आहे.”
-“पुराव्‍यांव्दारे मी सांगेल की, माझ्यावर नि दुस-या एका आयबी अधिका-यावर सत्‍य लपवण्‍यासाठी कसा दबाव टाकला जात होता.”
- “ माझ्या तक्रारीत त्‍या भ्रष्‍ट सीबीआय अधिका-याचे आणि नेत्‍याचे नाव असणार आहे. ज्‍यांनी हा कट रचून या केसला राजकीय रूप देण्‍याचा प्रयत्‍न केला होता.”
निवृत्‍तीनंतर बक्षिसाची ऑफर...
- कुमार यांनी दावा केला की, सीबीआयच्‍या त्‍या अधिका-याने पुरावे नष्‍ट करण्‍यासाठी निवृत्‍तीनंतर बक्षिस देण्‍याची लालूच दाखवली होती.
- कुमार म्‍हणाले, यूपीए सरकार तेव्‍हा गुजरातचे सीएम नरेंद्र मोदी यांना या एन्‍काऊंटरच्‍या माध्‍यमातून निशाणा बनवण्‍याच्‍या प्रयत्‍नात होते.
- यूपीएचे एक कॅबिनेट मंत्री आणि दुसरे कॉंग्रेसचे नेते मला अटक करण्‍याच्‍या तयारीत होते, असेही कुमार म्‍हणाले.
- या फेक एन्‍काऊंटरमध्‍ये मी मोदींचे नाव घ्‍यावे, अशी त्‍यांची इच्‍छा होती. मी असे करण्‍यास विरोध केला तेव्‍हा त्‍यांनी माझ्या विरोधात केस केली.
पुढील स्‍लाइड्वर पाहा, संबंधित फोटो....