आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटीश नागरिक होऊ शकतात ललित मोदी, भारत सरकारकडून अटकेची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो) ललित मोदी इन्सेट- लंडनमधील आलिशान घर - Divya Marathi
(फाइल फोटो) ललित मोदी इन्सेट- लंडनमधील आलिशान घर
नवी दिल्ली - आयपीएलमध्ये आर्थिक गैरव्यवहाराचे आरोपी माजी आयपीएल आयुक्त ललित मोदी ब्रिटनचे नागरिकत्व स्विकारण्याच्या तयारीत आहेत. सुरक्षेच्या कारणांमुळे मोदींनी 2010 मध्ये लंडनमध्ये पलायन केले होते. लंडनमधील चेल्सिया येथे 14 खोल्यांच्या आलिशान घरात सध्या ते किरायाने राहातात. जर ललित मोदींना ब्रिटीश सरकारचे नागरिकत्व मिळाले तर, विना व्हिसा ते जगातील 170 देशांमध्ये कोणत्याही अडचणींशिवाय फिरू शकतात. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ललित मोदींना ब्रिटनहून पोर्तुगालला जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप सध्या विरोधीपक्ष करत आहे. त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी जोर धरत आहे.
कसे मिळेल नागरिकत्व
ब्रिटनच्या कायद्यानुसार एखाद्या उद्योजकाने ब्रिटनमध्ये दोन लाख पौंड गुंतवणूक केल्यास किंवा त्याच्या कंपनीमध्ये 10 पेक्षा जास्त कर्मचारी असल्यास त्याला ब्रिटनचे नागरिकत्व मिळू शकते. ताज्या माहितीनूसार ललित मोदींनी स्टॉक मार्केट आणि शेअरमध्ये एक मिलियन पौंड गुंतवलेले आहेत.
अटकेबद्दल संभ्रम
जर ललित मोदींना ब्रिटनचे नागरिकत्व मिळाले तर भारत सरकारला त्यांना अटक करणे अवघड होणार आहे. त्यासाठी प्रत्यार्पण गरजेचे होईल. दुसरीकडे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ललित मोदींच्या अटकेसाठी मॉरिशस सरकारला नोटीस पाठवण्याची तयारी केली आहे. या नोटिशीबरोबरच त्यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) जारी करण्यास मदत होण्याची शक्यता आहे. यामुळे भारताने ज्या देशांसोबत प्रत्यार्पण करार केला आहे त्या देशातून त्याना अटक करणे सोपे होईल.