आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kiran Bedi Enters In BJP To Contest Election Know About Her

अण्णांच्या सहकारी ते दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य उमेदवार, वाचा किरण बेदींना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किरण बेदी यांचा जन्म 9 जुन 1949 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांच्या पतीचे नाव ब्रीज बेदी असून त्यांना सैना नावाची एक मुलगी आहे. अमृतसरच्या गर्व्हनमेंट कॉलेज फॉर वुमन येथून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. त्यानंतर चंदिगड येथील पंजाब विद्यापिठातून सोशल सायंसमध्ये मास्टर्स पूर्ण केले. 1988 मध्ये दिल्ली विद्यापिठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर सोशल सायंसमध्ये डॉक्टरेट मिळवली. यावेळी त्यांचा विषय 'ड्रग्ज, अब्युज अॅण्ड डोमॅस्टीक व्हायलंस' हा होता.
किरण बेदी यांनी अमृतसरच्या खालसा कॉलेज फॉर वुमनमध्ये पोलिटिकल सायंसच्या लेक्टरर म्हणून नोकरीला सुरवात केली. 1972 मध्ये त्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी झाल्या. पोलिस रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी प्रधान संचालक हे पद भूषविले आहे. डिसेंबर 2007 मध्ये त्यांनी आयपीएसमधून स्वेच्छानिवृत्ती घेतली.
टीव्हीवरील प्रसिद्ध रियालिटी शो "आप की कचेरी" मध्ये किरण बेदी यांनी न्यायाधीश आणि अॅंकरची भूमिका बजावली. यात रिअल लाईफ भांडणांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असे. त्यांनी नवज्योती दिल्ली पोलिस फाऊंडेशनची स्थापना केली होती. त्यानंतर 2007 मध्ये या संस्थेचे नामकरण नवज्योती इंडिया फाऊंडेशन असे करण्यात आले. बेदी यांना 1994 मध्ये रमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले. किरण बेदी यांची www.kiranbedi.com ही स्वतंत्र वेबसाईटही आहे.
ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माता मेगन डोनेमन यांनी किरण बेदी यांच्या जिवनावर Yes Madam, Sir हा चित्रपट तयार केला आहे. 2006 मध्ये नॉर्वेची एमपॉवर फिल्म अॅण्ड मीडिया आणि फिल्ममेकर ओयस्टीन राक्केनेस यांनी त्यांच्या आयुष्यावर डॉक्युमेंटरी काढली होती. Carve Your Destiny या चित्रपटातही किरण बेदी झळकल्या होत्या. 2009 मध्ये Kannadada Kiran Bedi हा कन्नड भाषेत त्यांच्या आयुष्यावर तयार केलेला फिक्शनल चित्रपट आला होता. I dare!: Kiran Bedi : a biography by Parmesh Dangwal आणि Kiran Bedi, the kindly baton by Meenakshi Saxena या किरण बेदी यांच्या बायोग्राफी प्रसिद्ध झाल्या आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सहकारी, अरविंद केजरीवाल यांच्या विरोधक... वाचा पुढील स्लाईडवर....