आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आमदाराने हॉटेलात बलात्कार केल्याचा अारोप, महिलेने ब्लॅकमेलिंग केल्याची तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरगाव - दिल्लीचे माजी आमदार व भाजप नेते विजय जॉली यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीच्या महिलेने तक्रार दिल्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली.  यासंबंधात गुरगाव महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.  या प्रकरणाची  माहिती देण्यास पोलिस टाळाटाळ करत आहेत,  तर आपल्याला या प्रकरणात अडकवून पैसे उकळण्याचा प्रयत्न असल्याचा  भाजप नेत्याची तक्रार आहे.   
 
भाजपच्या महिला शाखेची कार्यकर्ता दिल्लीतील महरोलीजवळील नेब सराय या गावी राहते. गुरगावच्या सेक्टर - ५१ महिला पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले : १० फेब्रुवारी रोजी भाजप नेत्यासोबत एका बैठकीत सहभागी होण्यासाठी गुरगावच्या एका हॉटेलात आली होती.
 
दुपारी १.३० च्या सुमारास महिला व भाजप नेता एका खोलीत बसले होते.  त्या खोलीत त्या दोघांनी मागवलेले सूप पिले. त्यानंतर तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध झाली. दोन तासानंतर शुद्ध आली. तेव्हा तिच्या शरीरावर कपडे नसल्याचे आढळले. ही परिस्थिती पाहून तिला रडू कोसळले आणि घरी जाण्याची विनवणी करू लागली.  
 
त्यानंतर सायंकाळी ४ वाजता ते दोघे सोबतच दिल्लीसाठी रवाना झाले. महरोली रोडवर लालबत्तीजवळ महिला उलटी करण्यासाठी खाली उतरली. आणि त्यानंतर ऑटोने घरी गेली. त्या महिलेने सर्व घटना पतीस सांगितली. या घटनेनंतर १० दिवसांनी तिने गुरगाव महिला पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून तपास सुरू केला आहे. पीडितेने  सांगितले, आपणास भाजप नेत्याकडून धमक्या मिळत आहेत.  हे प्रकरण दिल्लीत गाजते आहे. 
 
महिलेकडून ब्लॅकमेल  
दरम्यान, सदर महिला आणि तिचा पती आपणास ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप दिव्य मराठी नेटवर्कशी बोलताना माजी आमदार विजय जॉली यांनी केला. ते दोघे मला ५ लाख रुपये मागत होते. मी रक्कम देण्यास नकार दिला तेव्हा खोट्या प्रकरणात अडकवून राजकीय प्रतिमा मलिन करण्याची धमकीही त्यांनी दिली होती, असे ते म्हणाले. त्यांनी दक्षिण गुरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 
बातम्या आणखी आहेत...