आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Naxal Commander Who Was Raped And Tortured By Comrades Reveals The Culture Of Brutal Misogyny In The Maoist Movement

सहकारी महिलांवर बलात्‍कार करतात नक्षलवादी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- नक्षलवादी स्‍वत:ला गरीबांचा मसीहा असल्‍याचे सांगतात. मात्र, बंदी असलेल्‍या माओवादी समूहाच्‍या माजी महिला कमांडरने आपल्‍या पुस्‍तकात त्‍यांचे विकृत रूप जगासमोर आणले आहे. 'एक माओवादी की डायरी' नावाच्‍या या पुस्‍तकात माजी नक्षल कमांडर शोभा मंडीने नक्षलवादी चळवळीला दोष दिला आहे. बलात्‍कार, व्‍याभीचार, बायकांची अदला बदली आणि महिलांवर अत्‍याचार या नक्षलवाद्यांमध्‍ये होणारी सामान्‍य गोष्‍ट असल्‍याचे तिने म्‍हटले.

खुद्द शोभावर सहकारी कमांडरने सात वर्षांपर्यंत बलात्‍कार केला होता. शोभाने 2010 साली शरणागती पत्‍करली होती. त्‍यापूर्वी ती 25 ते 30 नक्षलवादी समूहाची कमांडर होती. शोभाला उमा आणि शिखा नावानेही ओळखले जात. शिबीरात महिला केडरबरोबर वाईट वतुर्णक केली जाते, असे 25 वर्षीय शोभाने म्‍हटले आहे. तिने याप्रकरणी किशनजी यांच्‍यासह चळवळीतील ज्‍येष्‍ठ नेत्‍यांकडेही महिलांबरोबर होणा-या वाईट वतुर्णकीसंबंधीची तक्रार केली होती. मात्र, त्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. नोव्‍हेंबर 2011 मध्‍ये सुरक्षा दलाच्‍या कारवाईत किशनजी ठार झाला होता.

दलातील वरिष्‍ठ महिला लीडर्सचे अनेक सेक्‍सुएल पार्टनर असतात. जर एखादी महिला गर्भवती राहिली तर तिचा गर्भपात केला जातो. नक्षलवादी मुलांना शत्रू समजतात. महिला या पुरूषांना संतुष्‍ट करण्‍यासाठीच असतात, असे येथे समजले जाते.