आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former President Abdul Kalam Passes Away Last Rites From Shilong To Delhi

बिहारच्या कृषि विद्यापीठाला कलामांचे नाव, ट्विटर अकाऊंट पुढेही सुरु राहणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बिहार सरकारने माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहाताना राज्यातील किशनगंज कृषि विद्यापीठाचे नामांतर डॉ. कलाम कृषि विद्यापीठ करण्याची घोषणा केली आहे. तर डॉ. कलामांच्या निकटवर्तीयांनी त्यांचे ट्विटर अकाऊंट यापुढेही सक्रिय ठेवण्यात येईल, असे सांगितले आहे. त्याच्या नावात थोडा बदल केला जाणार आहे. In memory of Dr Kalam असे ते करण्यात येईल.
कलामांच्या विचारांना समर्पित असेल त्यांचे ट्विटर अकाउंट
कलामांचे निकटवर्तीय सृजनपालसिंह यांनी एक ट्विट करुन सांगितले, 'त्यांचे ट्विटर अकाऊंट त्यांच्या विचारांना समर्पित असेल. या हँडलवरुन त्यांचे शिक्षणासंबंधीचे विचार आणि ध्येयवाद यापुढेही प्रसारित केला जाईल.' सिंह त्यांच्या ट्विटर अकाऊंटचे अॅडमिनिस्ट्रेटर म्हणून काम पाहाणार आहेत. त्यांच्या अकाऊंटवरुन त्यांची प्रेरणादायी भाषणे, त्यांची पुस्तके अग्निपंख, इंडिया 2020 आणि इतर पुस्तकांचा संपादित भाग प्रकाशित केला जाईल.
निधनाच्या एक दिवस आधी केला होता कुटुंबियांना फोन
माजी राष्ट्रपतींनी शिलाँग येथून कुटुंबियांना फोन केला होता. त्यांनी कुटुंबियांकडून 99 वर्षीय भाऊ मोहम्मद मुथू मीरा लीबाई मरायकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. कलामांचे पणतू सलीम यांनी सांगितले, की त्यांनी 26 जुलै रोजी सायंकाळी फोन केला होता. त्यांनी सांगितले होते, की शिलाँगमध्ये थंडी फार आहे. शिलाँगमध्येच कलामांनी अखेरचा श्वास घेतला.
दफनविधीसाठी जागा शोधली
कलामांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळगावी रामेश्वरम येथे अंत्यसंस्कार (सुपुर्द ए खाक) केले जाणार आहेत. त्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी रेल्वे स्टेशन परिसरातील मशिदी जवळील जागेची पाहाणी केली. कलामांचे चुलत बंधू कासीम मोहम्मद म्हणाले, त्यांच्या आठवणीत येथे एक मेमोरियल तयार केले जाईल.
रामेश्वरममध्ये दुकाने बंद, मच्चिमारांनी ठेवले काम बंद
कलामांच्या आकस्मिक निधनाने रामेश्वरमवर दुःखाचे सावट पसरले आहे. मंगळवारी गावातील सर्व व्यवहार बंद होते. मच्छिमारांनी तीन दिवस काम बंद राहाणार असल्याचे सांगितले.