आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former President And Eminent Scientist APJ Abdul Kalam Passed Away

अब्दुल कलाम अमर जाहले, हृदय बंद पडल्याने शिलॉंगमध्‍ये निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिलाँग - जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती, भारताचे मिसाइलमॅन एपीजे अब्दुल कलाम...कालपर्यंत हृदयात होते, आज आठवणींत सामावले म्हणजे अमर झाले. सोमवारी संध्याकाळी एक बातमी आली आणि संपूर्ण देश रडला. का रडू नये? ते सर्वांच्या हृदयातच तर होते.

नेहमी म्हणायचे-मी शिक्षक म्हणून राहणेच पसंत करेन. जाईन तेही शिक्षकाच्या रूपात. झालेही तसेच. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता आयआयएम शिलाँगमध्ये लेक्चर देत होते. तेव्हाच हृदय बंद पडले. बेशुद्ध होऊन पडले. तत्काळ रुग्णालयात हलवले, पण ७.४५ वाजता त्यांना मृत घोषित केले. देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. पण सुटी नसेल. डॉ. कलाम यांचे पार्थिव मंगळवारी दिल्लीत आणले जाईल. अंत्यसंस्कार रामेश्वरम या जन्मगावी होतील.
ते म्हणायचे- मी शिक्षक आहे आणि त्याच रूपात ओळख राहावी, अशी इच्छा आहे..

कलाम-राजू स्टेंट आणि हृदयविकार
हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत होण्यासाठी धमनीत टाकली जाणारी स्टेंट आयात करावी लागत होती. महागडी स्टेंट गरिबांना परवडत नव्हती. डॉ. कलामांच्या प्रेरणेने हृदयरोग तज्ज्ञ डॉ. बी. सोमा राजू यांनी पहिली भारतीय स्टेंट बनवली. तिचे नाव कलाम-राजू स्टेंट असे ठेवले गेले. कलाम यांचा मृत्यू हृदयविकारानेच व्हावा, याला काय म्हणावे? कलाम यांच्या प्रेरणेनेच डॉ. राजू यांनी उपचारात साह्यभूत टॅब्लेट पीसी तयार केला. त्याचे नावही कलाम-राजू टॅबलेट ठेवले गेले.

पुढे वाचा... 5 सूत्रे, कलामांच्या जीवनातून शिकण्यासारखी