आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former President Pervez Musharraf Accuses India Of Destabilising Pakistan

मुशर्रफ उवाच! म्हणाले, RSS दहशतवादी संघटना, मोदी त्यांचे सदस्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी पुन्हा एकदा भारताला डोळे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी दिलेल्या एका भारतीय वृत्तवाहिनीला मुलाखतीत म्हटले आहे की, भारतात जे काही दहशतवाद पसरवत आहेत तेच देशासाठी स्वतंत्रता सेनानी आहे सांगतात. एवढेच नव्हे तर मुशर्रफ यांनी म्हटले आहे की, जर आम्हाला भडकावले तर त्याचे उत्तरही तसेच मिळेल. मुशर्रफ यांनी शिवसेना आणि आरएसएस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) यांना दहशतवादी संघटना घोषित करून टाकले. ते म्हणतात, ही एक कट्टर हिंदू संघटना आहे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या संघटनेचे सदस्य आहेत.
'हक्कानी होते फ्रीडम फायटर'
मुशर्रफ यांना विचारण्यात आले की, यूनायटेड नेशन्सने हाफिज सईद आणि हक्कानी यासारख्यांना दहशतवादी घोषित केले आहे. त्यावर ते म्हणाले की, पाकिस्तानने हाफिजला बनवले आहे तो स्वत: बनला आहे. जेथे हक्कानीचा विषय आहे तर ते 80 च्या दशकात एक फ्रीडम फायटर्स होते. पाकिस्तानच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी पुढे सांगितले की, तुम्ही ज्यांना दहशतवादी म्हणता ते आमच्यसाठी मुजाहिद्दीन (स्वतंत्रता सेनानी) यासारखे आहेत.
'मोदी मुस्लिम आणि पाकिस्तान विरोधी'-
बांग्लादेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत मुशर्रफ म्हणाले, "मोदी बांग्लादेशात जातात आणि 1971 च्या सरेंडर सेरेमनीचे छायाचित्र शेअर करतात. याचा अर्थ काय आहे? 50 वर्षाची जुनी बाबी उगाळून ते काय साधू इच्छित आहेत?. मात्र, मोदींची ही हरकत कोणताही पाकिस्तानी सहन करणार नाही. ते मुस्लिम व पाकिस्तानविरोधी आहेत. गुजरात दंगलीचा उल्लेख करीत मुशर्रफ म्हणाले, काय तुम्ही 2002 दंगली विसरलात?, मोदी मुस्लिम विरोधी आहेत.
'आम्ही बांगड्या भरल्या नाहीत'-
मुशर्रफ यांना जेव्हा विचारण्यात आले की, म्यानमार मुद्द्यावरून नेपाळ, भूटान आणि श्रीलंका यासारख्या देशांना काही समस्या नाही तर पाकिस्तानला काय त्रास होत आहे? त्यावर मुशर्रफ म्हणाले, जर तुम्ही आमच्याविरोधात बोलाल तर पाकही जरूर बोलणार. भारताने मान्यमारमध्ये घुसून कारवाई केल्यानंतर मुशर्रफ यांनी आम्ही अणुबॉम्ब काही लग्नाच्या वरातीत फोडण्यासाठी ठेवलेले नाहीत. जर भारताकडून धमकी मिळाली तर पाकिस्तान घाबरणार नाही. आम्ही भांगड्या भरल्या नाहीत.
'कश्मीरचा मुद्दा संपुष्टात यावा'
कश्मीर मुद्द्याबाबत मुशर्रफ म्हणाले, तो एक राष्ट्रीय मुद्दा आहे, जो नक्कीच संपुष्टात आला पाहिजे. कश्मीरमध्ये जे लोक लढताहेत त्याला भारत दहशतवाद म्हणत आहे. तर आम्ही मुजाहिदीन म्हणतो. तेथील फुटीरवादी स्वताच्या हक्काची मागणी करीत आहेत.