आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former President Pratibha Patil Office Ask For Official Vehicle

पुण्याबाहेर जायला प्रतिभा पाटलांना हवेत शासकीय वाहन, सोशल मीडियावर खिल्ली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एकिकडे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना 'पिपल्स प्रेसिडेंट' असा जनकिताब देऊन गौरविले जात आहे तर दुसरीकडे माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची सोशल मीडियात खिल्ली उडवली जात आहे. पुण्याबाहेर जाण्यासाठी शासकीय वाहन मिळावे यासाठी पाटील यांच्या कार्यालयाने मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सला (MHA) पत्र लिहिले आहे.
विशेष म्हणजे पाटील यांना प्रत्येक महिन्याला पुण्याबाहेर जाण्यासाठी 250 लिटर पेट्रोल आणि शासकीय ड्रायव्हर देण्यात आला आहे. तरीही त्यांच्या कार्यालयाने ही मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, त्यांच्या या मागणीचा सोशल मीडियावर भरपूस समाचार घेतला जात आहे.
प्रतिभा पाटील सध्या खासगी वाहन वापरतात. त्यासाठी त्यांना पेट्रोल आणि शासकीय ड्रायव्हर देण्यात आला आहे. या ड्रायव्हरला सरकारी पेस्केल प्रमाणे पगार दिला जातो. पण नियमांप्रमाणे त्यांना शासकीय कार मिळू शकते.
यासंदर्भात पाटील यांचे खासगी सचिव जी. के. दास म्हणाले, की मला या प्रकरणी काही बोलायचे नाही. मला प्रेससोबत बोलण्याची परवानगी नाही.
3 जुलै 2015 रोजी यासंदर्भात अखेरचे कम्युनिकेशन करण्यात आले होते. पाटील यांच्या कार्यालयाने होम अफेअर्सला पत्र लिहिले होते. यात सांगितले आहे, की पाटील यांना कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी पुण्याबाहेर आणि पुण्यातही जावे लागते. यावेळी त्यांच्यासोबत शासकीय स्टाफ असतो. त्यांना शासकीय वाहन मिळावे.
याबाबत होम अफेअर्सने महाराष्ट्र सरकारला निर्देश दिले आहेत, की शासकीय नियमांप्रमाणे पाटील यांना दिल्या जाणाऱ्या सुविधी द्याव्यात.