आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Prime Minister Manmohan Singh Gets Major Relief Supreme Court For Coal Scam Issue Stays On Summon

माजी पंतप्रधानांना मिळाला दिलासा, डॉ. सिंगांविरुद्धचे समन्स सुप्रीम कोर्टामध्ये स्थगित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कोळसा घोटाळ्यात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व इतर पाच जणांविरुद्ध विशेष न्यायालयाने बजावलेल्या समन्सला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. म्हणजेच त्यांना ८ एप्रिलला कोर्टात हजर होण्यापासून सूट मिळाली आहे.
माजी पंतप्रधानांना समन्स जारी करताना सीआरपीसीच्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा युक्तिवाद सिंग यांचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. तो ग्राह्य धरत सीबीआयला नोटीस बजावून तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले.

सिब्बल यांचा युक्तिवाद
- सिब्बल म्हणाले, खाणवाटपाचा निर्णय प्रशासकीय. तो चूक वा बरोबर असू शकतो, बेकायदा नाही.
- स्क्रीनिंग प्रक्रिया खंडित केल्याचा समन्स होता. सिब्बल म्हणाले, कोर्टाने प्रक्रियाच बेकायदा ठरवल्याने तिला अर्थ उरत नाही.
- कट बेकायदा कामांसाठी रचतात. येथे असे काही झाले का?

पुढील स्लाइडवर वाचा, डॉ. मनमोहन सिंह दुसर्‍यांदा आरोपी...