आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जेव्हा माजी केंद्रीय मंत्री उचलतात राहुल गांधी यांची चप्पल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुदुचेरी (तमिळनाडू)- नेत्यांसाठी कार्यकर्ते काहीही करायला तयार असतात हे नेहमीच ऐकायला मिळते. पण कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या पुदुचेरी दौऱ्यात उपस्थितांना प्रत्यक्ष बघायलाही मिळाले. पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार एन. नारायणसामी यांनी चक्क राहुल यांची चप्पल उचलली.
त्याचे झाले असे, की पूरस्थिती असल्याने सर्वत्र चिखल झाला होता. यात राहुल यांचे बुट चिखलाने खराब झाले. यावेळी नारायणसामी लगेच समोर सरसावले. त्यांनी राहुल यांच्यासाठी हातात चप्पल आणखी होती. ती राहुल यांना घालण्यासाठी खाली ठेवली. त्यानंतर राहुल यांनी चपलेत पाय टाकले.
एक इंग्रजी वृत्तवाहिनीने याचा व्हिडिओ दिला आहे. यात नारायणसामी हातात चप्पल घेऊन दिसतात. त्यानंतर ते राहुल यांच्या पायांजवळ जमिनीवर चप्पल ठेवतात. राहुल अगदी अलगद त्या चपलांमध्ये पाय ठेवतात. यावेळी बॉडीगार्ड त्यांना आधारही देतात.
यासंदर्भात नारायणसामी म्हणाले, की राहुल गांधी यांना मी माझ्या चपला दिल्या. यात काही गैर नाही. मी माझ्या स्वतःच्या चपला हातात धरु शकतो. त्यांनी बुट काढल्यावर चालण्यासाठी चपला नव्हत्या. त्यामुळे मी माझी चप्पल त्यांना दिली.
चपला उचलण्याच्या राजकीय संस्कृतीबद्दल नारायणसामी म्हणाले, की कॉंग्रेसमध्ये नेत्यांच्या चपला उचलण्याची संस्कृती नाही. राहुल गांधी यांचे बुट चिखलाने माखले होते. तरी त्यांनी ते हातात धरले होते. बॉडीगार्डसनाही हातात पकडायला दिले नाहीत.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील युपीए सरकारच्या काळात नारायणसामी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री होते.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेचे आणखी फोटो.... नारायणसामी दिसतात हातात चप्पल घेऊन....
बातम्या आणखी आहेत...