आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GOA VOTING: सरासरी 75 टक्के मतदान, गोव्यात मोदी लाट -मनोहर पर्रीकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लोकसभेच्या निवडणुकीतील आज चौथ्या टप्प्यात देशातील 4 राज्यातील 7 जागांवर मतदान घेण्यात आले. आसाममध्ये 3 जागांवर, गोव्यात 2 तर सिक्कीम व त्रिपुरामधील प्रत्येकी एका-एका जागेवर मतदान झाले.
गोव्यात 75 टक्के विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. आसाममध्ये 75 टक्के, त्रिपूरा येथे 81.8 टक्के तर सिक्किममध्ये लोकसभा आणि विधानसभेसाठी 76 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
गोव्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन जागांवर पहिल्या तासातच 9 टक्के मतदान, तीन तासात 30 टक्के मतदान झाले होते. तर, 12 वाजता उत्तर गोव्यात सुमारे 43 टक्के तर, दक्षिण गोव्यात 45 टक्के मतदान झाले होते. दुपारीही मतदानाचा वेग कायम राहिला. त्यामुळे दुपारी 4 वाजता उत्तर गोव्यात 74 तर दक्षिण गोव्यात 71 टक्के मतदान झाले होते.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज सकाळीच मतदान केले. त्यावेळी गोव्यात मोदींची लाट असल्याचे वक्तव्य करीत गोव्यातील दोन्ही जागा मोठ्या फरकाने जिंकेल असे सांगितले. आज आसाममधील करीमगंज, सिल्चर आणि स्वशासी येथे मतदान झाले. तर, सिक्कीम व त्रिपुरा राज्यात प्रत्येकी जागा असल्याने तेथे संपूर्ण राज्याने मतदान केले. आसाममध्ये एकूण 30 लाख मतदार आपले तीन खासदार निवडतील. तर, सिक्कीममध्ये 3 लाख 70 हजार आणि त्रिपुरात 11 लाख 40 हजार मतदार आपला प्रत्येकी एक-एक खासदार संसदेत पाठवतील. गोव्यातील 10 लाख 53 हजार मतदार आपले दोन खासदार लोकसभेत पाठवतील.