आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येणारा आठवडा चांगल्या पावसाचा राहणार, स्कायमेटचा अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - येणारा आठवडा चांगल्या पावसाचा राहण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला. गुरुवारी राज्यात काही जागी पाऊस झाला. या आठवड्यात मराठवाड्यात पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली.

पावसाचा जोर वाढणार : स्कायमेटच्या मते, सध्याची स्थिती पाहता येणारा आठवडा जुलैच्या पहिल्या आठवड्यापेक्षा नक्कीच चांगला राहील. पश्चिम किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात मान्सून पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय राहील. मुंबई, गोवा, कोकण,कर्नाटक व केरळात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुणे वेधशाळेचा अंदाज :
महाराष्ट्रात गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथा, विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली. १० ते १३ जुलै : कोकण-गोव्यात ब-याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होईल.

जुलै मध्ये पर्जन्यमानात घट :
भारतीय हवामान खात्याच्या मते, जुलैमध्ये देशाचा ईशान्य भाग वगळता सर्वत्र पर्जन्यमान कमी झाले आहे. एक जून ते ८ जुलै या काळात देशभरात पर्जन्यमानाचे प्रमाण वजा चार टक्के (नकारात्मक पातळी)राहिले आहे. जुलै तसेच ऑगस्ट मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल.
पिकांसाठी चांगला पाऊस हवा :
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) मते, कडधान्ये, गळिताची धान्यपिके तसेच कापूस या पिकांसाठी आता पाऊस अत्यंत आवश्यक आहे. विशेषत: दक्षिण भारत, मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात या पिकांसाठीपावसाची नीतांत आवश्यकता आहे.खरीपातील ७० टक्के पेरणीसाठी देशभरात पावसाची गरज आहे.

तुटीचा जुलै :
स्कायमेटच्या मते, जुलैच्या पहिल्या आठवड्यात देशाच्या उत्तर व ईशान्य भागात मान्सून काही प्रमाणात सक्रीय राहिला. तर केरळात ३० टक्के तूट निर्माण झाली. कर्नाटकात ३२ टक्के तर कोकण व गोव्यात १५ टक्के पावसाची तूट राहिली.