आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Four Chief Minister Had PM Narendra Modi\'s Case In Court With Money Pulled Up Touching Bhushan Crying

मोदींसह चार मुख्यमंत्र्यांना पैसे दिल्याचे प्रकरण, न्यायालयात ओरडल्याने प्रशांत भूषण यांना फटकारले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : सहारा-बिर्ला समूहाच्या कथित डायऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह चार मुख्यमंत्र्यांना पैसे दिल्याच्या प्रकरणाची चौकशी करावी, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात गेलेले वकील प्रशांत भूषण यांना न्यायालयाने बुधवारी फटकारले. न्यायमूर्ती खेहर म्हणाले की, तुम्ही पंतप्रधानासारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीवर पैसे घेतल्याचा आरोप करत आहात. पुराव्याशिवाय असे करणे योग्य नाही.
युक्तिवादाच्या वेळी भूषण ओरडायला लागल्यावर न्यायमूर्ती खेहर म्हणाले की, तुमच्या ओरडण्यामुळे न्यायालयाचे शब्द बदलणार नाहीत.
सुनावणी सुरू होताच न्यायमूर्ती खेहर यांनी प्रशांत भूषण यांना ‘तुम्ही अजूनही ठोस पुरावे सादर केले नाहीत,’ असे सांगितले. त्यावर भूषण यांनी आणखी वेळ मागितला.
न्यायमूर्ती खेहर म्हणाले की, मागील सुनावणीच्या वेळी तुम्हाला २० दिवसांचा अवधी दिला होता. तुम्ही आणखी अवधी मागत आहात. जर तुमच्याकडे पुरावे नाहीत तर न्यायालयाने पुढे सुनावणी का करावी? त्यावर भूषण म्हणाले की, डायऱ्यांतील नोंदींची चौकशी करावी, अशी माझी मागणी आहे. त्यांनी नव्या पुराव्यांसाठी ११ जानेवारीपर्यंतचा अवधी मागितला. त्यावर न्यायमूर्ती म्हणाले की, तुमच्याकडे पुरेसे पुरावे नाहीत.
हवाला व्यवहारांचेही कोणतेही रेकॉर्ड नाही. डायरीत लिहिलेली गोष्ट पुरावा मानता येऊ शकत नाही. फोनवरील संवादाचाही पुरावा नाही. तुमच्याकडे असे काय आहे की त्याच्या आधारावर न्यायालयाने तुम्हाला वेळ द्यावा? त्यावर भूषण ओरडू लागले की माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी ते उद्याच सादर करेन.
बातम्या आणखी आहेत...