आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशातील 4 कोटी विधवा जगतात हलाखीचे जीवन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सती प्रथा संपली असली तरी अजूनही विधवांचे जीवन हलाखीचे असल्याचे देशभरातले चित्र आहे. देशात हलाखीचे जीवन जगणार्‍या विधवांची संख्या चार कोटींच्या आसपास असून हे प्रमाण एकूण महिलांच्या सुमारे आठ टक्के आहे, असे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
या विधवांच्या संरक्षणासाठी बनवलेल्या विधेयकावर संसदेच्या बजेट अधिवेशनात चर्चा व्हावी, अशी अपेक्षा वृंदावनमध्ये राहणार्‍या विधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे व्यक्त केली आहे. वृंदावनातील विधवा त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत आल्या होत्या.
‘विधवांचे जीवन अजूनही खडतर आहे. समाजाकडून त्यांना फारसे संरक्षण मिळत नाही. पुनर्विवाहाचे प्रमाण अजूनही कमी आहे. देशातील 8 टक्के महिला विधवा आहेत आणि फक्त 2.5 टक्के पुरुष विधुर आहेत. पुरुष दुसरे लग्न करतात, पण विधवांमध्ये अजूनही दुसर्‍या लग्नाचे प्रमाण कमी आहे. विधवा महिलांच्या समस्या मांडण्यासाठी संयुक्त राष्ट्राने 2011 मध्ये 23 जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन जाहीर केला आहे.