आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four IM Terrorist Arrested In Rajasthan, Police Seized Arms

वारणसीत उमदेवारी दाखल करताना मोदींवर हल्ला करण्याची होती दहशतवाद्यांची योजना!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद पसरवून देशात अशांतता निर्माण करण्याचे मनसुबे दिल्ली आणि राजस्थान पोलिसांनी हाणून पाडले आहेत. जयपूर आणि जोधपूर येथून इंडियन मुजाहिदीनच्या (आयएम) चार दहशतवाद्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे त्यांच्या चौकशीत समोर आले आहे. मोदी वाराणसीमध्ये उमेदवारी दाखल करण्यासाठी जातील तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याचे सांगितले आहे. मोदींना कोणताही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दिल्ली एटीएस व स्पेशल सेलसह राजस्थान पोलिसांनी मोठी कामगिरी केल्याचे गृहमंत्री शिंदे म्हणाले. इंडियन मुजाहिदीनचा मोस्ट वाँटेड दहशतवादी वकासला दिल्ली व राजस्थान पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पकडण्यात आले आहे. त्याला पकडण्यासाठी सरकारने 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. मुंबई बॉम्बस्फोटा दरम्यान वकासने ऑपेरा हाऊसमध्ये बॉम्ब प्लांट केले असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याशिवाय हैदराबादमधील दिलसुखनगर स्फोटातही त्याचा सहभाग होता.

दिल्ली एटीएस आणि राजस्थान पोलिसांच्या संयुक्त कारवाईत चार दहशतवाद्यांसह मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. शनिवारी उशिरा रात्री जोधपूर येथून एका दहशतवाद्याला स्फोटकासंह अटक करण्यात आले. जोधपूर येथील कारवाईनंतर जयपूर येथून तीन दहशतवाद्यांना पकडण्यात आले.
त्यांच्याकडून 25 किलो स्फोटके, 400 डिटोनेटर, टायमर जप्त करण्यात आले आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, कोण आहे वकास