आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Indian Mujahideen Terrorists Arrested, Had Plans To Target Narendra Modi

निवडणूक काळात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट; सहा पाकिस्तानी दहशतवादी जेरबंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इंडियन मुजाहिदीनचा अतिरेकी झिया उर रहेमान ऊर्फ वकाससह दिल्ली पोलिसांनी 6 दहशतवाद्यांना राजस्थानात पकडले. लोकसभा निवडणुकीदरम्यान देशात स्फोट घडवण्याचा त्यांचा कट होता. पेनड्राइव्ह, स्फोटके, टायमर, सर्किट, घड्याळे असे साहित्य त्यांच्याकडून जप्त केले आहे. वकासकडून स्फोटकांसह मॅग्नेशियम सल्फेटच्या बाटल्या, एरंडाच्या बिया, सोडियम क्लोराइड असे साहित्य जप्त करण्यात आले.

विशेष पथकाचे आयुक्त एस.एन. श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार वकासचा अनेक स्फोटांत हात आहे. पोलिस त्याचा शोध घेत होते. आयएसआयचा तो हस्तक आहे. शनिवारी सकाळी वांद्रे-अजमेर रेल्वेतून उतरताच त्याला अटक झाली. रविवारी जयपूरचा मोहंमद महरूफ (21), मोहंमद वकार अजहर ऊर्फ हनिफ (21) यांना पकडले. हे तिघेही अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होते. नंतर शाकीब अन्सारी (25) याच्यासह अन्य दोघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या.

पुढे वाचा मोदींच्या सुरक्षेबाबत सुशीलकुमार शिंदे काय म्हणाले