आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियाच्या उप पंतप्रधानांनी सांगितले- IS मध्ये जाणारे चार भारतीय आम्ही पकडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिल्लीत सिरियाचे उप पंतप्रधानांची भेट घेतली. - Divya Marathi
बुधवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिल्लीत सिरियाचे उप पंतप्रधानांची भेट घेतली.
नवी दिल्ली - सिरियाचे उप पंतप्रधान वालिद उव मुलीम यांनी म्हटले आहे, की चार भारतीय तरुणांना जॉर्डनमार्गे सिरियात घुसताना पकडण्यात आले आहे. त्यांना दमिश्क येथे ताब्यात घेण्यात आले. मात्र उप पंतप्रधानांनी त्यांना केव्हा पकडले हे सांगितलेले नाही.

सिरियाने माहिती दिल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा आता या चारही जणांची माहिती गोळा करत आहे. उप पंतप्रधानांनी चार जणांना ताब्यात घेतल्याचे सांगितले, मात्र त्यांची कोणतीही माहिती पुरवलेली नाही.

नागपूरातून पकडले होते तीन जण
सिरियाच्या उप पंतप्रधानांनी खुलासा केला, की भारत कट्टरवादाला वेसण घालण्याचे पुरेपूर प्रयत्न करत आहे.
डिसेंबरमध्ये नागपूर विमानतळावरुन तीन तरुणांना ताब्यात घेतले होते. हे तिघेही आयएसमध्ये सहभागी होण्यासाठी निघाले होते.
बातम्या आणखी आहेत...